मुंबई (प्रतिनिधी)- काल सकाळपासून प्रसारमाध्यमांवर नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग व्यक्तीचे पाया धुतल्याच्या राजकीय बातम्या प्रसारित होत असतांनाच मोदी सरकारने पोलिसांकरवी पुण्यामध्ये दिव्यांच्या मोर्चावर आज अमानुष लाठीचार्ज घडवून आणला आहे. या वरून मोदी दिव्यांगांचे राजकारण करीत असून या घटनेने ते उघड केले आहे. या झालेल्या लाठीचार्जमध्ये हे विद्यार्थी जखमी झाले असून सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला असल्याचे सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मिडिया सेल प्रमुख अमरदीप वानखडे यांनी कळविले आहे.
आज सकाळी पुणे आयुक्तालयासमोर संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांनी आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढला होता परंतु आयुक्तांच्या वेळकाढू धोरणामुळे दोन वाजेपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मुंबई पर्यंत पायी जाऊन शासन दरबारी आपल्या मागण्या मांडण्याचे ठरविले असता पोलिसांनी दमनशाहीचा वापर करून दिव्यांग विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी चार्ज केला. या संपूर्ण आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र कमिटीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून पुणे जिल्ह्यातील सम्यक विद्यार्थी आंदोलनाची टीम या आंदोलनकर्त्यांच्या बरोबर आहे.
भारतीय यांनी म्हटलं आहे की, एकीकडे मोदी दिव्यांगाचे पाय धुवून त्यांच्यावर प्रेम करत असल्याचा आव आणतात तर दुसरीकडे पोलिसी खाक्याच्या आडून त्यांच्यावर अमानुष लाठी चार्ज करत आहेत या संपूर्ण घटनेने विद्यार्थी या देशात असुरक्षित होत चालला असल्याचे टीका त्यांनी केली आहे.

0 टिप्पण्या