मुंबई (प्रतिनिधी)- १३ पॉईंट रोस्टर पद्धत रद्द करण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने 8 फेब्रुवारी रोजी राज्यभरातील विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर तीव्र निदर्शने केली होती. याची नोंद घेत केंद्र सरकारने या निर्णयाबाबत भूमिका मांडतांना १३ पॉईंट रोस्टर लागू करणार नसल्याची ग्वाही दिली आहे. हा आमचा संघटनात्मक विजय असून, आमच्या दबावाने केंद्र सरकार हादरून गेले आहे. याचे श्रेय आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला जाते. अशी प्रतिक्रिया सम्यक सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.
१३ पॉईंट रोस्टर हे बहुजन समाजाच्या संविधानिक हक्कांवर गदा आणणारे असून पूर्वीचे 200 पॉईंट रोस्टर पद्धत पुन्हा लागू करण्यात यावे यासाठी केंद्र सरकारची तयारी झाली असली तरी त्यासंदर्भात न्यायालयाने दिलेला निकाल अद्यापही रद्द केलेला नाही. हा निर्णय आम्ही कोणत्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नसून हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही दिल्ली येथे संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत "हुंकार रॅली" द्वारे १३ पॉईंट रोस्टर गो बॅक चा नारा देणार आहोत. या हुंकार रॅली मध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खासदार एड. प्रकाश आंबेडकर ही प्रमुख्याने सहभागी होणार आहेत, असे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मीडिया सेल प्रमुख अमरदीप वानखडे यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या