अकोलेकरांवर लादलेल्या करवाढी विरुध्द पुन्हा अॅॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी अंगावर चढवला काळा कोट

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अकोलेकरांवर लादलेल्या करवाढी विरुध्द पुन्हा अॅॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी अंगावर चढवला काळा कोट

महापालिका अवास्तव मालमत्ता विरोधात हायकोर्टात मांडली अकोलेकरांची बाजू 
नागपूर (दि.8 फेब्रुवारी) :- भाजप शासित अकोला महानगरपालिकेने एप्रिल2017 मध्ये घेतलेल्या ठरावानुसार अकोला महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांचा कर(टँक्स) तीन ते चारपट वाढविला.ह्या अवास्तव करवाढी विरोधात भारिपचे बहुजन महासंघाच्या वतीने नागपूर हायकोर्टात पिटीशन दाखले केलेले आहे. आज सदर प्रकरणाची सुनावणी असल्याने आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून नेहमी प्रमाणे स्वतः नागपूर हायकोर्टात मा.अॅॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आज युक्तिवाद करून अकोलेकरांची बाजू मांडली.


अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी कोर्टात सडेतोड युक्तिवाद केला.कोर्टाने यापुढील अंतिम सुनावणी दि.15 फेब्रुवारी रोजी निश्चित केली असून कदाचित त्याच सुनावणीत अंतिम सकारात्मक निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

यावेळीअॅॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात इतर अधिवक्तागण  ॲड संदीप चोपडे अँड संतोष राहाटे तसेच याचिकाकर्ते बालमुकुंद भिरड  व्यापारी यांचे प्रतिनिधी मन्नुसेठ पंजवानी नंदकिशोर निलखन हे हजर होते

अकोला महानगरपालिकेने अकोलेकरांवर बेकायदेशीर लादलेल्या मालमत्ता करा (टँक्स) विरोधात मा अॅॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रंचड आंदोलक भूमिका घेतली आहे.पक्षाच्या वतीने मोर्चे, धरणे आंदोलन व विविध आंदोलने करण्यात येत आहेत.

असे असले तरी वाढीव करा विरोधात भारिप बहुजन महासंघाच्या वतीने अॅॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वात गेल्या वर्षी महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. तसेच विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे सदर प्रकरणी तक्रार दाखल करून अॅॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी विभागीय आयुक्तांकडे झालेल्या सुनावणी दरम्यान वेळोवेळी युक्तिवाद केला. प्रकरणात अकोलेकरांना दिलासा मिळण्याच्या उद्देशाने राज्य सरकारकडे मा अॅॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रकरण लाऊन धरले.वर्षभरापुर्वी अॅॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी महापालिकेतील भारिपबमसंच्या नगरसेवकांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही राज्य सरकारने निर्णय घेतला नाही.त्यामुळे राज्य सरकारने यावर त्वरित निर्णय घ्यावा या करिता याचिका दाखल केली असून

करवाढी विरोधात नुकतेच दि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारिप बहुजन महासंघाच्या नेत्या प्रा अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वात एकदिवसीय सांकेतिक उपोषण केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या