दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सम्यक आक्रमक ; सामाजिक न्याय मंत्र्यांनी दिले मागण्या मान्य करण्याचे आश्वासन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सम्यक आक्रमक ; सामाजिक न्याय मंत्र्यांनी दिले मागण्या मान्य करण्याचे आश्वासन


मुंबई (प्रतिनिधी) पुणे येथे काल झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीचार्जच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन मैदानात उतरले असून विविध पातळ्यांवर निषेध व्यक्त केला आहे. यासंदर्भात आज सकाळी ८ वाजता सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय यांनी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना न्याय द्या अन्यथा तीव्र आंदोलन राज्यभरात उभारू असा इशारा दिल्यानंतर बडोले यांनी या प्रकरणी ताबडतोब निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. संबंधित मागण्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येत असून आम्ही आमच्या वतीने दिव्यांगांच्या संदर्भातील असलेले सर्व विषय निकाली काढले असून जे काही विषय राहिले असतील त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे. यावेळी सम्यकचे प्रदेश महासचिव अक्षय गुजर, मुंबई प्रदेश अध्यक्ष आकाश दोडके, सचिन कांबळे, रोहित चित्रे आदी उपस्थित होते.

या आश्वासनानंतर आज दुपारी पुणे समाज कल्याण आयुक्तालयामध्ये एक महत्वाची बैठक समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली या बैठकीमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष शुभम चव्हाण, संतोष जोगदंड उपस्थित होते. त्यांनी समाजकल्याण मंत्र्यांना तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावरील लढाईत उतरल्यास शासनाला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला.

दरम्यान या आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पुणे जिल्ह्याच्या पदाधिका-यांनी घटनास्थळी जाऊन काल पाठींबा दिला होता.

यासंदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने प्रदेश महासचिव प्रकाश इंगळे, अक्षय गुजर यांनी या घटनेचा निषेध म्हणून एक पत्र जाहीर केले होते. ते असे, 


या संदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमोल सिरसाट यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला.

तर बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सम्यकचे जिल्हाध्यक्ष प्रविण विरघट यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला.

एकूणच दिव्यांग विद्यार्थ्यांनाच्या प्रश्नावर सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक झाले असून या प्रकरणी सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन उभे करू असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मीडिया सेल प्रमुख अमरदीप वानखडे यांनी राज्य कमिटीच्या वतीने दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या