विद्यापीठात घुमला १३ पॉईंट रोस्टर गो बॅकचा नारा ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विद्यापीठात घुमला १३ पॉईंट रोस्टर गो बॅकचा नारा ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

औरंगाबाद (प्रतिनिधी)- भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १३ पॉईंट रोस्टर चा निषेध म्हणून न्यायालयाने घेतलेला हा निर्णय मागे घ्यावा यासाठी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रकाश इंगळे आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष पवन साळवे यांनी केले.

यासंदर्भात बोलताना प्रकाश इंगळे म्हणाले की, १३ पॉईंट रोस्टर ही पद्धत आरक्षण विरोधी असून न्यायालयाने घेतलेला हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा कारण या रोस्टर पद्धतीनुसार बहुजन समाजाचे घटनेने दिलेले अधिकार हिरावून घेण्याचा हा प्रकार असून याविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आम्ही राज्यभरात '१३ पॉईंट रोस्टर गो बॅक' चा नारा दिला आहे. यापूर्वी अस्तित्वात असलेली २०० पॉईंट रोस्टर पद्धत पुन्हा लागू करावी अन्यथा आम्ही देशपातळीवर व्यापक आंदोलन उभारून न्यायालयावर दबाव आणून बहुजन समाजविरोधी निर्णय घेण्यास भाग पाडणा-या बीजेपीची सरकार उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही. आज राज्यभरातील विद्यापीठाणांवर आणि ज्या जिल्ह्यात विद्यापीठ नसेल त्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयांवर आम्ही मोर्चाची हाक दिली आहे. आणि याद्वारे देण्यात आलेल्या निवेदनाची प्रत कुलगुरू आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा. राज्यपाल आणि मा. राष्ट्रपती यांना पाठविण्याची आम्ही मागणी केली आहे. या मागणीला घेऊन आम्ही देशपातळीवर व्यापक लढा उभारला असून येत्या १८ फेब्रुवारीला दिल्ली येथे संसद भवनावर  घेराव घालणार आहोत.



या मोर्चामध्ये सम्यकचे मीडिया सेल प्रमुख अमरदीप वानखडे, राहुल खंदारे, जयश्री शिर्के, सृष्टी दौंड, विजय धनगर, अनिल दीपके, अण्णासाहेब सोनोवणे, सिद्धार्थ मोरे, सुनील वाघमारे, मयूर गायकवाड, अमोल घुगे, भागवत चोपडे, ऍड. नागसेन वानखडे, राहुल कांबळे, अनिल दीपके, अक्रम खान, रामेश्वर गोरे, नारायण खरात, भीमराव वाघमारे, विश्वजीत घुगे, युसुफ बर्डे, सिद्धार्थ कांबळे, सिद्धार्थ गायकवाड, मंगेश गवई, प्रकाश वाडेकर, विकास तुरेराव, अनिल दांडगे, सुनील खंडारे, विलास खांडे, सुरेश तूपसमुद्रे, राहुल पंडित, सुदर्शन दिपके, मिलिंद दाभाडे, विकास जाधव, कुणाल गायकवाड, स्वप्नील कडू, भीमराव शिरसाट, वाल्मीक वाघ, निखिल रोस्ते, रवींद्र गवळी, आदींसह विद्यापीठातील विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या