मुंबई
टीम सोशल नेटवर्क
लोकशाहीचे सामाजिकीकरण व्हावे यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांनी देशातील तमाम वंचित बहुजनांना एकत्र करून "वंचित बहुजन आघाडी"ची स्थापना केली आहे. त्यामुळे प्रस्थापित पक्षांना जोरदार हादरा बसला आहे. वंचित घटकाला निवडणुकीच्या रिंगणात उतरून बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आणून त्यांना प्रतिनिधित्व देण्याचे काम केले आहे. बाळासाहेब आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत याबरोबरच त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालविण्यात येणाऱ्या सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेच्या राज्यभरातील तमाम कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने जाहीर आवाहन करतो की, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना त्या-त्या जिल्ह्यातून लागेल ती मदत करून या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. यासंदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलन मीडिया सेल प्रमुख अमरदीप वानखडे यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.
या पत्रकाद्वारे महेश भारतीय म्हणाले की, बाळासाहेबांनी ज्यांना प्रस्थापित पक्षांनी आतापर्यंत कायम सत्तेच्या बाहेर ठेवले होते त्यांना लोकशाहीच्या सामाजिकीकरण्यासाठी निवडणुकीच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी घेतली आहे. आज महाराष्ट्रातील तमाम वंचित समूहातील छोटे-छोटे घटक हे वंचित बहुजन आघाडी मध्ये सहभागी झालेले आहेत तर तेलंगणा येथील एम आय एम पक्ष हा सुद्धा छोटा भाऊ म्हणून निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उतरला आहे. अशा वेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी राज्यभरातील सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपापल्या जिल्ह्यामध्ये सहकार्य करावे.
0 टिप्पण्या