(भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय यांना पदभार स्वीकारण्याला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया सेल प्रमुख अमरदीप वानखडे यांनी या एका वर्षाचे केलेले विश्लेषण)
ज्या ज्या वेळी समतावादी समाजव्यवस्था निर्माण होऊ पाहते त्या त्या वेळी विषमतावादी व्यवस्था समाजामध्ये मिसळविण्याचे आणि त्याद्वारे समतावादी विचार गाडण्याचे काम या देशात झाले आहे. ते भ. बुद्धांपासून संत कबिरांपर्यंत, महात्मा फुल्यांपासून छ. शिवाजी महाराजांपर्यंत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून गाडगे महारांपर्यंत. जेव्हा जेव्हा परिवर्तनाची सुरूवात झाली तेव्हा तेव्हा ही विषमतावादी विचारसरणी आपले डोके वर काढून बहुजन समाजाकडून त्यांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेण्यासाठी पुढारली. वंचित बहुजन समाजाचे हक्क मग ते शैक्षणिक असो, सामाजिक असो, राजकीय असो वा आर्थिक असो. परंतु ही विषमतावादी विचारसरणी जरी समतावादी विचारसरणी उद्ध्वस्त करू पाहत होती तेव्हा तेव्हा भ. बुद्धापासून ते गाडगे महाराजांपर्यंतच्या सर्व महापुरुषांनी ही व्यवस्था उलथुन टाकली आहे. हा इतिहास बहुजन समाजाचा आहे. देशाला स्वातंत्र मिळून आज ७० वर्ष लोटताहेत परंतु आजही या विशमतावादी विचारसरणीची पिलावळ जिवंत असून या व्यवस्थेला उलथुन टाकण्याची जबाबदारी आता बहुजन समाजाची आहे. अन्यथा ही व्यवस्था बहुजन समाजाचे हक्क आणि अधिकार हिरावुन घेतल्याशिवाय राहणार नाही. इतिहास साक्षी आहे की, ज्या ज्या वेळी बहुजन समाजावर अंतिम टोकाचा अन्याय होत आहे त्या त्या वेळी या बहुजन समाजातुन एक नायकत्व निर्माण झाले आहे. मग ते छ. शिवाजी महाराज असोत वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर असोत. हे त्या त्या काळातील बहुजन समाजाचे नायक होत. आणि आज देशात निर्माण झालेली परिस्थीती पाहिली तर समतावादी विचार रूढ होतांना दिसून येताच विषमतावादी व्यवस्था निर्माण करण्याचे काम स्वतः सरकारद्वारे होत असतांना आजच्या आमच्या युगाचे नायकत्व बहुजनांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. ते आज घडीला बहुजन समाजाने निवडले आहे. आणि ते म्हणजे अॅड. प्रकाश आंबेडकर होय. संपुर्ण बहुजन समाज आज बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा असून या युगाचे बहुजन समाजाचे नायक बाळासाहेब आंबेडकर आहेत हे बहुजन समाजाने मान्य केले आहे. आज बाळासाहेब आंबेडकर सर्व पातळयांवर नेतृत्व करीत असून भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातुन सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग त्यांनी राज्यात घडवून आणला आहे. आणि ही बाब विषमतावादी व्यवस्थेला उद्ध्वस्त करणारी अशी आहे. अॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात राज्यभरातील तमाम बहुजन समाज "वंचित बहुजन आघाडीच्या" नावाखाली एकत्र झाला आहे. तो आता सत्ता मिळावून आपल्यावरील अन्यायाला झुगारु पाहत आहे. त्याने तसा ठाम निश्चय केला आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचितांना सत्तेत जाण्यासाठी जो विश्वास निर्माण केला आहे ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी कोरली जाणारी घटना ठरणार आहे.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात भारिप बहुजन महासंघाच्या अनेक शाखा कार्यरत आहेत. त्यामध्ये महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, फुले-आंबेडकर विद्वत सभा, सांस्कृतीक आघाडी, सोशल मिडीया कमिटी आदींसह अनेक कमिटयांवर त्या त्या क्षेत्रातील विद्वान आणि सामाजिक जाणिव असलेल्या मान्यवरांना बसविण्यात आले आहे. त्यापैकी एक असलेल्या सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय यांना साम्यकची सूत्र स्वीकारून एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या नेतृत्वामध्ये सम्यकने घेतलेली उभारी याची बहुजन समाजासमोर मांडणी व्हावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या आंदोलनात कशासाठी सहभागी व्हावे करीता हा लेख प्रपंच.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी तीन दशकांपूर्वी ही चळवळ उभी करून विद्यार्थ्यांना त्यांचे न्याय हक्क मिळावेत, त्यांना त्यांचे अधिकार मिळावेत यासाठी विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांच्या फळीचे नेतृत्व करून आपल्या न्याय हक्कांसाठी लढा उभारावा ही यामगील भूमिका. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर काम करत असतांना त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवुन देण्यात ‘सम्यक’ यशस्वी होत होती. परंतु निवडक ठिकाणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे काम सुरू होते. त्यामध्ये औरंगाबाद हे आघाडीवर होते. तर उर्वरित मराठवाडयात आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात धडाडीचे कार्यकर्ते कार्यरत होते. एकुणच पुर्णवेळ अध्यक्ष मिळाला नसल्याने या संघटनेची बांधणी पाहिजे तशी राज्यभरात झाली नव्हती. परंतु ९ मार्च २०१८ मध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाची जबाबदारी बाळासाहेब आंबेडकरांनी सामाजिक जाणिव असलेले, चळवळीमध्ये आपले संपुर्ण आयुष्य वेचणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक आंदोलनात सहभागी झालेले कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे वारसदार महेश भारतीय यांची निवड केली आणि देशभरातील प्रस्तापित राजकारण्यांना एक जोरदार हादरा दिला. कारण ज्या दोन्ही वेळी बाळासाहेब आंबेडकर लोकसभेत निवडून गेले होते त्या वेळी त्यांचे सचिव म्हणून दिल्लीमध्ये उत्कृष्टपणे ज्यांनी भूमिका निभवली होती ते महेश भारतीय होत.या नियुक्तीनंतर ते आता विद्यार्थी चळवळीतुन काय स्ट्रोक मारतील याची चिंता आणि एकच चर्चा या राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. ही चर्चा नेमकी सुरू झाल्या-झाल्या भारतीय यांनी जोरदार बॅटींग करायला सुरूवात केली. आणि पहिल्याच बॉलमध्ये सिक्सर मारत भारतीय यांनी मार्च महिन्यातच ‘युजिसी बचाव शिक्षण बचाव’चा नारा दिला. हा मोर्चा केवळ विद्यार्थ्यांच्यासाठीचाच मोर्चा नव्हता तर संविधानानुसार ज्या मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, ओबीसी बहुजन समाजातील नेट - सेट धारक विद्यार्थी, ज्यांना एमफील, पिएचडी करण्यासाठी आरक्षण मिळते, फिलोशिप मिळते, जेआरएफ मिळते बंद करण्याचा आणि युजीसी नियमानुसार विद्यापीठात होणा-या नोक-या बंद करण्याचा हा कुटील डाव या सरकारने आखला होता, युजीसी ही संस्था जी विद्यापीठे चालविते त्या संस्थेची स्वायतत्ता काढुन घेण्याचे कारस्थान रचले जात होते. आणि एकदा का युजीसीची स्वायतत्ता काढून घेतली की मग तीथे खासगीकरण आखुन बहुजन समाजाला शिक्षणापासुन आणि नोकरीपासुन वंचित ठेवायचे ही यामागील असलेली बाजु होती. त्यावेळी भारतीय यांनी पहिल्याच चेंडून मारलेला सिक्सर इतर कुठल्याही विद्यार्थी संघटनेला या शासनाच्या या निर्णयानंतर मारता आला नव्हता. यामुळे त्यांच्यातील राजकीय, सामाजिक परिपक्वता महाराष्ट्राला दिसून आली. कारण शासनाच्या या निर्णयाविरोधात देशभरातील कोणत्याही विद्यार्थी संघटनेने किंवा प्राध्यापक, शिक्षक संघटनेने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती तीथे भारतीय यांनी राज्यभरातील २४ विद्यापीठांवर मोर्चे काढले. या मोर्चातुन जिल्हाधिकारी यांना निवेदनाची एक प्रत तर दिलीच त्याचीच एक प्रत प्रधानमंत्री सचिवालय आणि एक प्रत राष्ट्रपती सचिवालयाला दिल्याने या मोर्चामुळे शासनाला जोरदार हादरा बसला. शासन खळबळून जागे झाले.
हे आंदोलन यशस्वी होत असतांनाच भारतीय यांनी आदीवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत राज्यभरात मोर्चे काढण्याचे आदेश दिले. आदीवासी विद्यार्थी ज्याच्या प्रश्नावर आजपर्यंत कोणत्याही विद्यार्थी संघटनेने आवाज उठविला नाही त्या आपल्या आदीवासी बांधवाला न्याय मिळावा यासाठी राज्यभरातील सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक मोर्चा दिला. या मोर्चांचे वैशिष्टय म्हणजे राज्यभरातील आदीवासी विद्यार्थी ज्याला आपल्याला मिळत असलेल्या अधिकारची ओळखही नव्हती तो आता आपल्या प्रश्नावर जागा होऊन आपले अधिकार मागु पाहत होता. सम्यकच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज, विद्यापीठ, वसतीगृहांमध्ये जाऊन आदींवासी विद्यार्थी बांधवावर येत असलेल्या संकटाची त्याला माहिती दिली. आणि हा सर्व विद्यार्थी वर्ग राज्यपातळीवर या आंदोलनामध्ये सहभागी झाला. संघटना बांधणीची कुशलता काय असते हे भारतीय यांच्या या भूमिकेतुन तर दिसून आलीच याउलट आदीवासी विद्यार्थ्याला त्यांचा न्याय मिळाला. हा संघटनेचा विजय या ठिकाणी झाला होता. आदीवासी विद्यार्थ्यांच्या शिशष्यवृत्तीचा प्रश्न, वसतीगृहाचा प्रश्न, मेसचा प्रश्न, विद्यार्थींनींच्या सेनॅटरी नॅपकिनचा प्रश्न आदी प्रमुख मागण्या या मोर्चाच्या ठळक मागण्या होत्या. केवळ एवढया मागण्या समोर ठेवून आम्ही लढलो नाही तर आदीवासी विभागाचे अधिकारी विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या निधीमध्ये कसा भ्रष्टाचार करतात? हे ही समोर आणले त्याचा परिणाम म्हणजे शासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला आणि आदिवासी विभागावर कमिशन नेमण्यास शासनाला भाग पाडले. त्याचा परिणाम म्हणजे आदीवासी विभागातील ६०० अधिका-यांवर कारवाई झाली त्यांच्यावर केसेस दाखल झाल्या. आणि आदीवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळाला. या मोर्चाचा एवढा धसका शासनाने की, राज्यात ३६ वसतीगृहे उभारून भटक्या समाजासाठी स्वतंत्र बजेटची तरतुद करण्याच्या मागणीला मंजुरी दिली. या आंदोलनामुळे आंदोलनामुळे शासनाला केवळ हादराच बसला नव्हता तर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या विद्यार्थ्यांनी राज्यभर केलेल्या आंदोलनामुळे एक वचक निर्माण झाला होता.
दि. ९ मार्च २०१९ एका वर्षमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाने विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर, समस्यांवर २०० च्या आसपास मोर्चे, आंदोलने , निदर्शने संपूर्ण महाराष्ट्रभर केली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दि. १५ मार्च २०१८ रोजी एस्.सी / एस.टी./ ओबीसी विद्यार्थ्याचा शिष्यवृत्ती मोर्चा, २६ मार्च रोजीचा अॅड. बाळासाहेब यांच्या नेतृत्त्वाखाली एल्गार मोर्चा, डीबीटीच्या विरोधातील आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन, गोवा येथील प्रशिक्षण शिबीर, सम्यकच्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीमध्ये उल्लेखनीय केलेले कार्य, भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीची जबाबदारी मा. बाळासाहेब आंबेडकरांनी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष महेश भारतीय यांच्यावर सोपविली आणि २०१४ च्या निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाला १९०० मतदान होते ते ४१,००० मतदान मिळवून यश मिळविले. असे उल्लेखनीय कार्य घडले ते केवळ महेश भारतीय यांचे सक्षम नेतृत्व आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे. यासह जिल्ह्या-जिल्ह्यात शिक्षण बचाव मोर्चा, यूजीसी बचाव मोर्चा, 'Dangerous Curve' या पुस्तकाचे प्रकाशन, जिल्हास्तरीय सम्यकचे अधिवेशन, औरंगाबाद येथील राज्यव्यापी अधिवेशन, सम्यकच्या घटनेची आणि झेंड्याची निर्मिती, १३ पॉईंट रोस्टर विरोधातील विद्यापीठांवरील मोर्चे आणि कलेक्टर ऑफीसवरील निदर्शने, शेगाव-बुलढाणा लोकशाही जागर परिषदेचे आयोजन, मुंबईत शिक्षण
हक्क परिषदेचे आयोजन, आयुर्वेदीक, मेडीकल, युनानी आणि नर्सिंग शाखेतील विद्याथ्र्यांच्या
प्रश्नांवरील आंदोलन तसेच दिल्ली येथील शिक्षा हुंकार रॅली इत्यादी. विविध मोर्चे/आंदोलन शिबीर केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सम्यकने ५०,००० च्या आसपास सदस्य नोंदणी करुन विद्यार्थी चळवळीमध्ये वेगळा ठसा उमटवण्याचे काम या एका वर्षात महेश भारतीय यांच्या नेतृत्वात झाले आहे.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाने मिळवलेले यश
१) ३ वर्षे एस्.सी / एसटी / ओबीसी / अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती२६ मार्चच्या एल्गार मोर्चा ने सुरू झाली.
२) आदिवासी विद्याथ्र्यांच्या प्रश्नांवरती डिबीटीचे आंदोलन राज्यभर करण्यात आले त्या
आंदोलनातील इतर मागण्या अशा होत्या की, त्यामध्ये आदिवासी विभागातील १०४ कोटीचा
भ्रष्टाचार, न्या. गायकवाड आणि करंदीकर समिती यांनी ६५० अधिका-यांवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला होता. त्या अधिका-यांवर एफ.आय.आर. नोंदणीची मागणी मान्य झाली. हे सम्यकचे यश आहे. डिबीटी या पध्दतीला सम्यकचा कायम विरोध राहीला आहे आणि पुढेही राहणार आहे.
३) आदिवासी वसतीगृह ही शहराच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आणावीत ही मागणी मान्य झाली आहे.
४) आदिवासी विद्याथ्र्यांची आरोग्य तपासणी नियमित करावी, वसतीगृहाचे फ्युमिगेशन करावे, तसेच मुलींना सॅनिटरी नॅपकीनच्या पुरवठ्याची मागणी मान्य झाली आहे.
५) महिला आदिवासी वसतीगृहाला महिला अधिक्षक असावी ही मागणी मंजूर झाली आहे.
६) ६५,००० हजार जिल्हा परिषद शाळांपैकी २२,००० हजार शाळांच्या दुरुस्तीला गती आली तसेच त्याकरिता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी सम्यकने शाळा पायाभूत सुविधा फंड निर्माण करण्यासाठी राज्यभर कलेक्टर कार्यालयावर मोर्चे काढले होते.
७) ओबीसी विद्याथ्र्यांकरिता मुलींचे १६ आणि मुलांचे २० वसतीगृह मंजूर करून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद देखील करण्यात आली आहे. हे सम्यकचे दैदिप्यमान यश आहे त्यासाठी सातत्याने महाराष्ट्र अध्यक्षांनी मंत्रालयात पाठपुरावा केला होता.
८) २४,००० हजार शिक्षकांच्या भरतीची मागणी सम्यकने सातत्याने केली. त्यापैकी १०,००१
शिक्षक भरतीला मान्यता देवून त्यासंबंधीची जाहिरात देखील राज्यशासनाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे.
९) महाराष्ट्रात नेट / सेट धारकांची संख्या ८८,००० हजार असताना ७५,००० हजार जागा रिक्त आहेत त्यापैकी ४,००० हजार प्राध्यापकांची पदे भरण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. बाकी जागाही भरण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
१०) रेल्वे विद्यापीठाची मागणी मंजूर करण्यात आली आणि हे रेल्वे विद्यापीठ गुजरात येथील बडोदा येथे सुरू करण्यात आले आहे. तसेच रेल्वे विद्यापीठाच्या शाखा विविध राज्यात सुरू व्हाव्यात यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात मा. पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले आहे.
११) केंद्रीय शैक्षणिक संस्थानांमध्ये २५ टक्के महिला कोट्याची मागणी करण्यात आली होती. ती आता
भारतातील आय.आय.टी. शैक्षणिक संस्थांमध्ये २५ टक्यापैकी १४ टक्के जागांना मंजूरी देण्यात
देऊन त्याची अंमलबजावणीही झाली आहे. ते ही अगोदरच्या राखीव जागांना हात न लावता १४
टक्के वाढीव जागा देण्यात आल्या आहेत.
१२) केंद्रातील भाजप सरकारने नियोजन आयोग' रद्द करून त्या ऐवजी निती आयोग' आणला त्याच
धर्तीवर 'यूजीसी' रद्द करून ‘उच्च शिक्षा आयोग' आणणाच्या सरकारचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी
राज्यभरासह देशात सम्यकच्या नेतृत्वात लक्षणीय मोर्चे काढण्यात आले. यूजीसी रद्द करण्याच्या
विरोधात 'Dangerous Curve' पुस्तक छापण्यात आले. आणि त्याच्या प्रती विविध राजकीय
पक्षांचे खासदार यांना विनामूल्य वाटप करण्यात येऊन हा धोका अधोरेखित करण्यात आला. याचे
यश म्हणजे युजीसी रद्द करण्याला अनेक खासदारांनी विरोध दर्शविला. परिणामी युजीसी रद्द
करण्याचा निर्णय सरकारला २ वेळा मागे घेण्यास भाग पाडले.
१३) शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठात अस्तित्वात असलेले २०० पॉईंट रोस्टर रद्द करण्याच्या सुप्रिम
कोर्टाच्या निर्णयाला आणि त्यांनी १३ पॉईंट रोस्टर लागू करण्याचा जो निर्णय दिला त्याला विरोध
म्हणून ८० विद्यार्थी संघटनांसह दिल्ली येथे १८ फेब्रुवारी २०१९ रोजी मोर्चा काढण्यात आला होता.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन दिल्ली येथे भरलेल्या जनसंसदेत मोदी सरकार राबवित
असलेल्या जनविरोधी शैक्षणिक धोरणांना विरोध दर्शविण्यात आला. तसेच अध्यक्षांनी त्या
ठिकाणी आपली भूमिका मांडली. ८ फ्रेबुवारी २०१९ रोजी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांवर १३
पॉईंट रोस्टरच्या विरोधात आंदोलने केली. तसेच याबाबत राष्ट्रपतींना विद्यापीठांमार्फ आणि
कलेक्टर मार्फत निवेदन देण्यात आले. परिणामी १३ पॉईंट रोस्टर रद्द करण्याचा केंद्रसरकारने
अध्यादेश काढला. हे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे यश आहे.
एकूणच महेश भारतीय यांनी आपल्या नियुक्तीनंतर एक वर्षाच्या कालावधीमध्ये संघटना बांधणी, संघटना उभारणीसाठी राज्यभर दौरे करून संघटना मजबुतीसाठी पाऊले उचलली आहेत. त्यांच्या कामाची गती अविश्वसनीय अशी आहे याचा मी स्वतः साक्षीदार आहे. अमरावती विभागामध्ये एका दिवसात तीन जिल्ह्यात सात ठिकाणी शाखेचे उद्घाटन करणारे देशातील पहिले प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय असावेत. आज महेश भारतीय, सम्यकच्या राज्य समन्वयक स्वाती भारतीय, प्रदेश महासचिव प्रकाश इंगळे, अक्षय गुजर यांनी संघटना वाढीसाठी केलेले प्रयत्न निश्चितच वंचितांचे सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे आहे. येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला आणि श्रध्देय नेते मा. बाळासाहेब आंबेडकरांना आपल्याला दयायची आहे. त्यांच्या मागे आपण सर्व ताकद भक्कमपणे उभी करून आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत. सम्यक विद्यार्थी आंदोलनाची भरभक्कम बाजू उभी करण्यात महेश भारतीय यांचा मोलाचा वाटा आहे. प्रदेश अध्यक्ष पदावर एक वर्ष झंझावातातच पूर्ण करणा-या भारतीय सरांना शुभेच्छा...
अमरदीप वानखडे
मीडिया सेल प्रमुख
सम्यक विद्यार्थी आंदोलन
महाराष्ट्र राज्य
मो. ९५९५८९२५४२

0 टिप्पण्या