आज आमचे जे काही आहे
ते सर्व तुझेच आहे
हे जगणे आणि मरणे
हे शब्द आणि ही जीभ
हे स्वप्न आणि वास्तव
ही भूक आणि तहान
ही सर्व पुण्याई तुझीच आहे
जागतिक कवी नामदेव ढसाळ यांच्या ह्या ओळी ऐश आरामात जीवन जगणाऱ्या माणसाला सांगून जातात , आज तुझे जे काही आहे हे सर्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षातून मिळालेलं आहे म्हणून आज बाबासाहेबांना विसरून आपण काहीच करू शकत नाही त्या मुळे बाबासाहेबांच्या विचारांना आणि वारसदारांना आपण जपलं पाहिजे .
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक युगाचं नांव आहे या युगपुरुषाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचे स्वतंत्र निर्माण करून दिले ,आणि समाजात समता ,स्वतंत्र ,न्याय आणि बंधुभाव या विचारांची पेरणी करून एक निर्भिड आणि स्वाभिमानी समाज निर्माण केला म्हणून या महामानवाला मी वंदन करतो नतमस्तक होतो .पुर्वीच्या समाज व्यवस्थेत आम्ही कसं जीवन जगत होतो हे आता सांगण्या सारखे नाही पशु मांजरांना गोंजारून माणसाला मातीत आणि पाण्यात पाहणारी संस्कृती इथं होती आज दोन पुस्तकं शिकून आम्ही असे होतो तुम्ही तसे होता या वरून चर्चा खूप झालीत पण बाबासाहेबांना आणि त्यांच्या विचारांना किती बहुजनांनी स्वीकारले की फक्त नोकरी साठी ? हा विचार सुध्दा विचार करायला लावण्या सारखा आहे . असो बांधवांनो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा संघर्ष समजून घेतांना मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर ही भारतीयच आहे .या विचार सरणी मधून आपल्याला दिसून येईल की त्यांनी तळागाळातील ,दिन दलित भटक्या विमुक्त अश्या सर्वच बहुजनांना स्वाभिमानाने जीवन जगता यावं या साठी त्यांनी आपल्या संसाराची पर्वा न करता इथला बहुजन समाजच आपला सर्वकाही समजून त्यांच्या साठी इथल्या कर्मठ जातीयवादी लोकांच्या संघर्षाला हिमालया सारखी टक्कर देऊन एक निर्भिड आणि स्वाभिमानी समाज निर्माण केला .या समाजा मधूनच आज आपल्याला त्यांचा निर्भिड पणा दिसून येतो .
इतिहासाची पाने वाचतांना इथल्या बहुजन समाजाचं आणि माणसाचं जीवन कसं होतं ? कोणी गावकुसाबाहेर तर कुणी भटकंती करनारे या सर्वांचा बाबासाहेबांनी विचार करून आपल्या बुद्धीच्या जोरावर या माणसांना एकत्रित करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं परंतू आजची परिस्थिती किती अवघड आणि कपटी आहे .ज्यांना जीवदान दिलं तीच माणसं आज स्वतःच्या स्वार्थासाठी व्यवस्थेतील गब्बर असणाऱ्या माणसा सोबत जाऊन बाबासाहेबांच्या विचारांना विसरतांना दिसतात . जयभीम म्हणायची सुध्दा त्यांना लाज वाटते .अशी बेईमान माणसं जर समाजात निर्माण झाली तर या स्वाभिमानी समाजाचं वाटोळं होण्यास वेळ लागणार नाही .आमचा बाप म्हणणारे जेंव्हा बापाला विसरतात ,तेंव्हा आई ची अवस्था लेकुरवाळी असून वांझोटी सारखी होईल यात शंका नाही .ज्यांना चळवळीचं काहीच देणं घेणं नाही ती माणसं राजकारणाच्या फडात जाऊन नाचतांना दिसतात .याच मुळे आपला समाज भयग्रस्त असल्यासारखा वाटतो .
मित्र हो ! आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आपण अनेक संकटांना आणि संघर्षाना पिटाळून लावले ,आणि पिचून काढले या मधूनच क्रांती निर्माण झाली या क्रांतीतून आपण आज सुरक्षित आहोत .पण आजच्या सोशल मिडिया वरील बालबुद्धी विचारवंतांच्या प्रतिक्रिया पाहून मन सुन्न होते .ज्यांच्या मुळे आज आपण हिमालया सारखे उभे आहोत .तेच लोक कधी कधी प्रश्न उपस्थित करतात कोण आंबेडकर ? हा प्रश्न जेंव्हा विचारतात तेंव्हा मला सांगावेसे वाटते ही भाषा त्यांची नाही .त्यांच्या तोंडून ते वदविली जाते , वदवून घेतली जाते .म्हणून आजच्या परिस्थितीत बाबासाहेबांच्या अनुयायाने दक्ष राहून भारतीय समाज मनात गढूळ वातावरण निर्माण करणाऱ्यांना वेळीच थांबविले पाहिजेत. तसेच ज्यांना आपण आपल्या विचारांचा समजू शकत नाही त्यांच्या पेक्ष्या ही भयंकर निळं भडक बोलताना तेच जर फितूर निघाले तर त्यांना ही आपल्याला थांबविता आले पाहिजेत कारण आज काल अस्तिनातील सापांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असतांना आपल्याला दिसून येत आहे .या मुळेच आपल्या बहुजन समाजा मध्ये दारिद्र्य,बेरोजगारि चे प्रमाण मोठया प्रमाणात वाढत आहे .या करिता बहुजन समाजातील सुशिक्षित विचारवंत तरूणांना माझे सांगणे आहे .आपले हित आपण समजून घ्या , क्षणभर सुखा साठी पिढ्यानपिढी च्या सावली ला तोडू नका त्यांना जपा तुम्ही कुणामुळे सावलीत आहात हा थोडा विचार करा , अभ्यास करून बाबासाहेबांना समजून घ्या पूर्वीचे दिवस आणि आजचे दिवस यात जमीन अस्मानाचा फरक आहे .आज आपण जे आनंदात दिवस जगतो ही देण फक्त अन फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आपल्याला प्राप्त झाल्याचे विसरू नका .
बाबासाहेबांनी अख्या वंचित बहुजन समाजाला समृद्ध करण्यासाठी विविध संस्था स्थापन केल्या ,वृत्तपत्र निर्माण केलीत विविध उठाव व संघर्ष करून आपल्याला लिहितं आणि बोलतं केलं याची जाण बहुजन समाजाला असणं अत्यंत महत्वाचं आहे . करण या साठी इतिहासाला साक्ष ठेऊन आपण आपलं जीवनमान सुधारलं पाहिजे .
गाव पातळीवरील फालतू राजकारणा मुळे अनेक युवकांचे जीवन क्रूर आणि कर्मठ विचारामुळे उध्वस्त झाल्याचे असपल्याला दिसून येते , गावपातळीवरिल जातीयवाद करणारे हे अशिक्षित असल्यामुळे गोरगरिबांची प्रगती त्यांना सहन होत नाही त्यांची पोटदुःखी वेगळी च असते पण मला अश्या विचारांच्या लोकांना सांगावेसे वाटते की , तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता जोतीराव फुले , छत्रपती शाहू महाराज ,डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या विचारांना समजून घ्या यातच तुमची प्रगती आहे .कारण जसं पेराल तसंच उगवणार आहे हा निसर्गाचा नियम आहे .म्हणून आपलं जीवन सुखी व समृद्धी ठेवायचं असेल तर "भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत " हेच तत्व निर्माण करून सुखी समाधानाने जगा कारण माणसाचं जीवन हे मोबाईल च्या व्हावचर सारखे आहे बोलले बोलले आणि संपले रिचार्ज करायला सुध्दा वेळ मिळणार नाही म्हणून फुले ,शाहू बाबासाहेबांच्या विचाराने आपला मेंदू रिचार्ज करा जातीय द्वेष ,दंगली ,भेदा भेद टाळा एकमेकांना कमी समजू नका यातच आपलं हित आहे .राजकारण मरण व्हायला नको .
माणसाला माणूस म्हणून जगता यावं म्हणून बाबासाहेबांनी अतोनात कष्ट सहन केले ,बाबासाहेबांनी स्वतःच्या संसाराची पर्वा न करता ,आपल्या सारख्यातील माणसाचे समाजाचे सुखी संसार उभारले , समाजाच्या व देशाच्या हिता साठी दिवसेंदिवस ते व्याख्यान ,सभा ,उठाव ,मोर्चे ,आंदोलन या करिता अख्या देश पिंजून काढला या मुळे त्यांच्या स्वतःच्या घरा कडे दुर्लक्ष झाले रामजी बाबाचं निधन ,रमाई चं निधन ,इंदूचं आणि राजरत्न यांचं निधन हे केवळ आपल्या सुखा साठी फिरत असतांना घरा कडे दुर्लक्ष झाल्या मुळे झाले याची भरपाई कोण देणार ....? याचाही बहुजन समाजाने विचार करण्यासाठी तयार झाले पाहिजे .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव यशवंतराव उर्फ भय्यासाहेब आंबेडकर यांच्या ही जीवन संघर्षाचा इतिहास वेगळाच आहे .भय्यासाहेब यांना सुद्धा व्यवस्थेतील कर्मठ जातीयवाद्यां कडून खूपच त्रास तर झालाच पण आपल्यातील असणारे फितूर ज्याला आपण अस्तिनातील साप म्हणू ,अश्या लोकांपासून सुद्धा भय्यासाहेबांना अतोनात त्रास झाला त्यांना सुद्धा खूप खूप छळल्या गेले एका महापुरुषाच्या मुलाचा इतिहास अभ्यासतांना त्यांना होणारा त्रास मन सुन्न करून जातो .भय्यासाहेब एक बुद्धिवादी विचारवंत होते .ज्ञानिवंत होते,संसदपटू होते त्यांनी सुध्दा आपल्या बहुजन समाजा साठी खूप कष्ट आणि त्रास सहन केला पण कुणाच्या वळचळणीला जाऊन बसले नाही त . म्हणूनच आपण त्यांना सुर्यपूत्र म्हणतो .आपण बाबासाहेबांनाच समजू शकलो नाहीत तर भय्यासाहेब यांना कधी समजून घेऊ ? हा ही एक विचार करण्या सारखा प्रश्न आहे .
मित्र हो ! भय्यासाहेबांचे विचार आपल्या समाजा पर्यन्त इथल्या कर्मठ व्यवस्थेने येऊच दिले नाहीत .म्हणून भय्यासाहेब यांचा संघर्ष ही आपण आज रोजी विसरता कामा नये तसेच भय्यासाहेब यांच्या सुविध्य पत्नी महाउपसिका आदरणीय मिराताई आंबेडकर यांनी बाबासाहेबांचा आणि भय्यासाहेब यांचा वारसा तितक्याच ताकदीने समोर आणला आहेत नेत आहेत त्यांचे राजकीय ,सामाजिक आणि धार्मिक कार्याची नोंद घेतली असता आज ही ते जगात शांतता निर्माण होण्यासाठी घरा घरात बुध्द विचार पेरत आहेत .बाबासाहेबांचे विचार समाजमनात मांडत असतांना ते सक्षम आहेत .परंतु आजची परिस्थिती आपल्याला दिसून येते की भारतीय बौद्ध महासभा च्या माध्यमातून ते भारत भर धम्मपरिषदा ,धर्मांतराचे सोहळे आयोजित करून बाबासाहेबांचे विचार जन सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत आहेत परंतु हे सर्व करीत असतांना त्यांना होणारा त्रास ते कोणाला सांगतील हे ही आंबेडकरवादी माणसाने समजून घ्यायला हवे ,आज रोजी या आंबेडकरी कुटुंबा कडे या कर्मठ व्यवस्थेने आपापसात भांडणे लावून बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थांचा अधिकार वेग वेगळे लोक दाखवितात तर अश्या वेळी आपण चूप बसणार का ? ज्या बाबासाहेबां मुळे आज आपण माणूस म्हणून स्वाभिमानाने जीवन जगत आहो त्या बाबासाहेबांच्या वारसदारांना आपण काय भेट म्हणून देऊ ..? मानसिक त्रास ...खरोखरच या मुळे आपल्या समाजाची प्रगती होईल की अधोगती या कडे सुजाण नागरिकाने वा समाजाने लक्ष देऊन आपले कर्तव्य म्हणून आंबेडकरी घराण्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आजच्या घडीला अत्यंत महत्त्वाचे आहे .
बाबासाहेबांच्या वरसदारांचा विचार करीत असतांना हे कुटुंब आपण आपल्या देशात निर्भिड व स्वतंत्रपणे स्वाभिमानाने जीवन जगलो पाहिजे म्हणून अहोरात्र कष्ट करीत असते, परंतु राजकारणी फितूर माणसं क्षणाच्या स्वातंत्र्या साठी बाबासाहेबांना बेईमान होऊन वारसदारांना नावे बोटे ठेवण्यात मग्न असतात .ज्यांची लायकी सुद्धा जमिनीवर जगण्याची नसते ते सोशल मीडिया वरून आंबेडकरी घराण्या विषयी काही बाही बोलतात आणि या मध्ये बोलणारे कोण ? तर ते आपल्या मधूनच असतात अश्यांना वेळीच थांबवून ठेचले पाहिजे ,राजकारणाचा माज असलेल्यांना मला सांगावेसे वाटते की अरे आज जे काही तुम्ही आहात ते बाबासाहेबांच्या प्रचंड संघर्षा मुळेच आहात .म्हणून बाबासाहेबांच्या वारसदारांना तुम्ही विसरून कसे चालणार ऍड.बाळासाहेब आंबेडकर , मा.आनंदराज आंबेडकर ,मा.भीमराव आंबेडकर यांना आता आपण जपलं पाहिजे .या वारसदारांना जपलं तर उद्याचा काळ आपल्या साठी उज्वल आहे .कारण समाजात आज घडीला किती घाणेरडे आणि गढूळ वातावरण आहे .या वातावरणाला स्वच्छ करण्याची ताकद फक्त आंबेडकरी घरण्यातच आहे .म्हणून तमाम भारतीयांना सुखाचे ,समृध्दी चे दिवस पहायचे असेल तर आणि समाजात समता, स्वतंत्र,न्याय आणि बंधूभाव रुजवायचा असेल तर आंबेडकरी घरण्यावर उदात्त प्रेम करा या कुटुंबाने तुमच्या चेहऱ्यावर पिढ्यांपिढी साठी हसू फुलविले आहेत .म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आमचा ऑक्सिजन आहे हा बंद होता कामा नये ,म्हणून बाबासाहेबांचं घराणं हे आपल्या तळ हातावरील फोडा प्रमाणे आहे .त्यांना जपा यातच आपलं हित आहे .सामाजिक ,धार्मिक आणि राजकीय असणारी आपली वाट या पुढे राजगृहा कडे वाटचाल करील आणि आता फक्त आपण प्रकाशाच्या मार्गाने मार्गक्रमण करूया सर्वांना मंगलमय सम्यक शुभेच्छा ! जयभीम VBA
प्रा.देवानंद पवार
09158359628
औरंगाबाद
3 टिप्पण्या