सम्यकच्या आंदोलनाला यश ; डॉ. पायल तडविंच्या हत्येस जबाबदार असलेल्या अटक ; खटला जलदगती न्यायालयात पारदर्शितपणे चालविण्याची मागणी

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सम्यकच्या आंदोलनाला यश ; डॉ. पायल तडविंच्या हत्येस जबाबदार असलेल्या अटक ; खटला जलदगती न्यायालयात पारदर्शितपणे चालविण्याची मागणी

मुंबई

पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना म्हणजे डॉ. पायल तडवी यांची संस्थात्मक हत्या असून या हत्येस जबाबदार असलेल्याना तात्काळ अटक करा अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलनाचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाने दिला होता. यासह वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा राज्यभरात तीव्र आंदोलन सुरू केले होते. त्याचा परिणाम आज आग्रीपाडा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाई बद्दल आज आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आभार मानले आणि डॉ. पायल तडवीच्या हत्येस जबाबदार असलेल्यांवर जलदगती न्यायालयात पारदर्शितपणे खटला चालवून  आरोपींना कठोर शिक्षा करावी, कोणत्याही परिस्थितीत आरोपींना जमानत देऊ नये अशी मागणी आहे.

यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या राज्य समनव्यक स्वाती भारतीय, सम्यकचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आकाश दोडके, सचिन कांबळे, सय्यद वसीम, आशुतोष कोचरे, गौरव गमरे, कावेरी भारतीय आदींसह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या