मुंबई/प्रतिनिधी
लहान उद्योगांसाठी आणि नवउद्योजकांना योग्य दिशा मिळावी यासाठी उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या अथक परिश्रमातून आज राज्य सरकारने तीन हजार कोटी रुपयांचे अनुदान, दहा लाख नोकऱ्यांची उद्दिष्ट खासगी बँकांच्या सहभागातून पुढील पाच वर्षासाठी रोजगार निर्मितीचे धोरण तयार केले आहे. त्यासाठी तीन हजार कोटी रुपयांचे थेट अनुदान देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
डॉ. हर्षदीप कांबळे हे सामाजिक जाणिव जोपासणारे अधिकारी म्हणून त्याची ख्याती आहे. यापूर्वीही अनेक पदांवर असतांना त्यांनी नवतरुणांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्फुर्त केले आहे. आणि आजही त्यांचा सामाजिक दृष्टीकोन परिवर्तनशील आहे. त्यांच्या संकल्पतेतुन आणि नियोजनातुन लवकरच दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि दहा लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट सरकारद्वारे साद्य होणार आहे. यामध्ये ३०% कोटा हा महिला आणि अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ५ ते १० टक्के सहभाग द्यावा लागणार असून खासगी बँका यासाठी ६० ते ७० टक्के कर्ज देणार आहे तर राज्य सरकार यासाठी १५ ते ३५ टक्के अनुदान देण्यात आहे. या धोरणाला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत दरवर्षाला लहान उद्योग सुरू करण्यासाठी जवळपास 30 हजार अर्ज प्राप्त होतात परंतु या योजनेचे उद्दिष्ट तीन ते पाच हजार उद्योग घटकांना मान्यता देण्यापुरते मर्यादित असल्याने उद्योग-व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना फारशी संधी मिळत नाही ही मर्यादा लक्षात घेऊन आणि जास्तीत जास्त लघु उद्योग व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य देण्यासाठी ही योजना माहिती विकास आयुक्त यांच्या मार्गदर्शनात व त्यांच्या अधिकारामध्ये सुरू करण्यात आली आहे.
या संदर्भात उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले की, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत पहिल्या वर्षी विविध क्षेत्रात २० हजार लघु उद्योग घटक सुरू होतील. त्यामध्ये दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, दोन लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार पाच वर्षात एक लाख लहान उद्योग सुरू होतील, त्यात दहा हजार कोटी रुपये गुंतवणूक आणि दहा लाख नोकऱ्या निर्माण होतील.
9 टिप्पण्या
मला चांगले अनुभव आलेला आहे
मी कधी कर्ज काढले नाही
पहिल्या ंंंं प्रयत्न केला होता
तसा gr काढा
Mahiti dyavi, apply kada ,kuthe karava, patrata vagaire