अकोला - पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांच्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघटनेच्या वतीने विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांना वारंवार निवेदने देऊनही त्यावर कोणत्या प्रकारची कारवाई प्रशासनाच्यावतीने केलेली नाही. त्यामुळे कंत्राटदार आणि कंपनीचे साटंलोटं असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरज सोनवणे यांनी केला आहे.
यासंदर्भात सोनवणे म्हणाले की, विद्युत केंद्राच्या प्रशासनाने आम्ही वारंवार दिलेल्या निवेदनावर कुठल्याच प्रकारची कारवाई केलेली नाही कोणत्याच कामगारांचे प्रश्न सोडवले नाहीत त्यामुळे हे प्रशासन कामगार विरोधक असून काम करणाऱ्या लोकांच्या जीवावर हे अधिकारी वर्ग गलेलठ्ठ पगार कमावतात परंतु ज्याच्या तळहातावर ही कंपनी उभी आहे, विद्युत पुरवठा निर्माण होतो तो कामगार मात्र उपाशी आहे तेव्हा विद्युत केंद्राच्या प्रशासनाने तात्काळ याची दखल घ्यावी आणि कामगारांच्या समस्यांना तातडीने सोडवावे अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असे सूरज सोनवणे म्हणाले.
0 टिप्पण्या