स्वतंत्र दिनापासून कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघाचे साखळी उपोषण/आमरण उपोषण

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

स्वतंत्र दिनापासून कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघाचे साखळी उपोषण/आमरण उपोषण


पारस (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघाची स्थापना संस्थापक नेते अॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 2017 पासुन कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी करण्यात आली आहे. राज्यभरात या संघटनेचे व्यापक जाळे असून गेल्या एक वर्षापासुन अकोला जिल्हयात या संघटनेचे काम जोमाने सुरू आहे. पारस येथील औ. विद्युत केंद्रातील कामगारांच्या विविध समस्यांवर संघटनेच्या वतीने वारंवार आंदोलने करण्यात आली आहेत. कामगारांच्या हिताच्या अनेक मागण्या संघटनेने लावुन धरून औ. वि. केंद्र प्रशासनाकडुन त्या मान्यसुद्धा करवुन घेतल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कंत्राटी कामगारांच्या हिताच्या प्रश्नांसंबंधी अनेकदा विद्युत केंद्र प्रशासनाकडे संघटनेच्यावतीने निवेदने देण्यात आली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी औ.वि.कें. पारस व महाराष्ट्र बहुजन कामगार संघाच्या शिष्टमंडळ यांच्यात दि. 1 ऑगस्ट 2019 रोजी एक बैठक संपन्न झाली होती. परंतु या बैठकी दरम्यान चर्चेमध्ये कोणतेही फलित न निघाल्यामुळे महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघाने साखळी उपोषण/आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला असल्याची संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते सूरज सोनवणे यांनी बाळापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेतून दिली. या पत्रकार परिषदेला धनराज तावडे, संघटनेचे प्रसिद्धिप्रमुख अमरदीप वानखडे, कायदेशीर सल्लागार ऍड. प्रशांत उमाळे आदी उपस्थित होते.



या आहेत मागण्या
१) ESIC सुविधा पारस येथे कंत्राटी कामगारांना उपलब्ध करुन देण्यात यावी.
२) परिपत्रक क्र. ४४०७ नुसार किमान वेतन देण्यात यावे
३) परिपत्रक क्र. १३२४ दिनांक १९ मे २०१९ च्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात यावी.
४) किमान कायद्यानुसार कंत्राटदाराने कंत्राटी कामगारांना प्रत्येक महिन्याच्या ७ तारखे पर्यंत वेतन अदा करण्यात यावे
५) परिपत्रक क्र. ०९२८ दिनांक २५ फेब्रुवारी २०१९ वाढीव ०१/०१/२०१९ पासुन आज पर्यंत वाढीव पगार दिलेला नाही तो देण्यात यावा.
६) पत्रक क्र १३९५ दिनांक २० मार्च २०१९ नुसार आपण कंत्राटदारांना सुचना करून देखील त्यांनी त्यावर कोणत्याही प्रकारे आपल्या पत्रकाची दखल घेतली नाही. त्याच्यावर परिपत्रक क्र १३२५ दिनांक १९ मे २०१७ नुसार कायदेशीर कारवाही करण्यात यावी.
७) परिपत्रक क्र ४४०६ दिनांक ३ ऑक्टोंबर २०१७ नुसार ७००० रु किंवा किमान वेतन ह्यापैकी जे जास्त असेल ते देण्यात यावे. असे असुन सुध्दा आपल्या पारस मध्ये फक्त ३५०० रु एव्हढा २०१८ चा दिवाळी बोनस दिलेला आहे. तरी कामगारांना ७००० रु किंवा त्यापेक्षा जास्त दिवाळी बोनस देण्यात यावा जर कंत्राटदाराने ७००० रु बोनस दिलेला आहे असे सांगण्यात येत असेल त्या संबंधी पुरावा संघटनेला देण्यात यावा.
८) या पुढे दिनांक २४/०७/२०१९ पासुन कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचे नवीन कंत्राट निज्ञाल्यास कामगार कामावर ठेवतांना आधी पारस येथील सुशिक्षित बेरोजगार लोकांना प्राधान्य देण्यात यावे त्यानंतरच इतरांचा विचार करण्यात यावा
९) नियमाप्रमाणे कामगारांना वेळोवेळी शासकिय सुट्या देण्यात याव्यात सुट्टीच्या दिवशी कामगारास कामावर बोलावल्यास
त्याला त्या दिवसाची दुप्पटीने देण्यात यावी.
१०) पगार पत्रक देण्यात यावे. (ESIC OT BASIC PF नियमानुसार भत्ते) समाविष्ठ असावे.
११) कंत्राटी कामगारांना काम करीत असतांना लागणारे सुरक्षा विषयक साधने पुरविण्यात यावी जसे सेफ्टी बुट, हेल्मेट, गणवेश, ओळखपत्र व इतर साहित्य देण्यात यावे.
      सदरील मागण्या औ. वि. केंद्र प्रशासनाने तात्काळ मान्य कराव्यात या मागणीसाठी दि. 15 ऑगस्ट 2019 ते 23 ऑगस्ट 2019 पर्यंत साखळी उपोषण पुकारल्या जाणार आहे. या उपोषणाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघटनेचे धनराज तावडे, बी.डी. गायकवाड हे करणार आहेत. औ.वि. केंद्राच्या अधिका-यांनी दि. 23 ऑगस्ट 2019 पर्यंत या संदर्भात निर्णय न घेतल्यास झोपेचे सांग घेऊन बसलेल्या अधिका-यांना झोपेतुन जागे करण्यासाठी दि. 25 ऑगस्ट 2019 पासुन कामगार नेते सुरज सोनोवणे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण पुकारण्यात येणार असल्याची माहिती सोनवणे यांनी यावेळी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या