तमाम आंबेडकरी कलावंतांच्या उपस्थीतीत बाळापुरात आंबेडकरी जलसा संपन्न
बाळापुर (दि. २५ ऑगस्ट २०१९) - महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्था, बाळापुर जि. अकोलाच्या वतिने महाकवी वामनदादा कर्डक जयंती आगळया वेगळया पद्धतीने साजरी करण्यात आली. गेल्या पाच वर्षापासुन संस्थेच्यावतीने महाकवी वामनदादा कर्डक जयंती महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केल्या जातो. यंदाचे या सोहळयाचे हे सहावे वर्ष असुन या वर्षी संस्थेच्यावतीने पुरस्कर्त्यांना व उपस्थीत मान्यवरांना हार तुरे नाकारून झाड भेट देऊन सत्कार करण्यात आला.
एक झाड एक पुरस्कार हा उपक्रम म्हणजे ख-या अर्थाने पर्यावरणाचे सक्षमीकरण आहे. सामाजिक बांधिलकी जोपासुन समाजात कार्य करणा-या लोकांना पुरस्कृत करणे ही सामाजिक भुमिका घेउन हा सोहळा आज संपन्न होत आहे. पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल कायम राखता यावा यासाठी शासन आपल्या परिने कार्यरत आहेच परंतु सामाजिक बांधिलकी म्हणुन पुरस्काराबरोबर हार तुरे नाकारत झाड भेट देणारा संस्थेचा हा उपक्रम ऐतीहासिक असुन बाळापुर शहर हे सातत्याने इतिहासात जिवंत ठेवणारा उपक्रम महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्थेच्या वतिने राबविली जात असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात केले.
स्व. सैयद हुसामोद्दीन खतीब सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन सामाजिक न्याय विभागाच्या उपयुक्त जयश्री सोनकवडे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. संतोश हुशे हे होते. विषेश अतिथी म्हणुन प्रसिद्ध सिने अभिनेत्री सीमा पाटील या उपस्थीत होत्या. हा पुरस्कार वितरण सोहळा सुचना एवम प्रसारण मंत्रालय भारत सरकारचे माजी उपसंचालक प्रा. विजयकुमार गवई यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विचार मंचावर फुले-आंबेडकर विद्वत सभा औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रा डॉ भारत सिरसाट, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रा प्रकाश इंगळे, पत्रकार महासंघाचे उपाध्यक्ष रामदास वानखडे, गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक लक्षण जढाल, न्यू व्हिजन इंग्लिश हायस्कुलचे संचालक विनायकराव बागडे, जीवन डीगे, भोई समाज संघटनेचे गणेश सुरजूशे, चर्मकार महासंघाचे भोनाजी ठोंबरे, धोबी समाज संघटनेचे प्रमोद दंबेलकर, भा.मु.मो. जिल्हाध्यक्ष मेजर गुलाब उमाळे, बौद्ध बांधव उत्सव समितीचे प्रकाश वानखडे, एमआयएम चे तालुकाध्यक्ष मो. इरफान, डीबीएन ग्रुपचे आकाश इंगळे, पहेलवान ग्रुपचे निखिल वाकोडे, डिएसएस ग्रुपचे आसिफ शाह, अश्वजीत सिरसाट, सरपंच सागर उपर्वट, सरपंच प्रदीप इंगळे, सरपंच राष्ट्रपाल पाटील, सरपंच शेषराव वानखडे, सरपंच अतुल दांडगे, सरपंच सारंग सुर्वे, भारिप बमसचे प्रदीप सिरसाट, सुभेदार मेजर माणिकराव सिरसाट, सुभेदार मोहन उमाळे, रिपचे जिल्हासंघटक आकाश हिवराळे, विद्यार्थी नेते पवन गवई, आनंद सोनोने, शुभम तिडके, प्रतुल विरघट, पारितोष इंगोले, अक्षय डोंगरे, शेखर इंगळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अमरदीप वानखडे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ आंबेडकरी गायक नागसेन दादा सावदेकर आणि शाहीर देवराव अंभोरे यांनी सुरुवात केली. त्यानंतर उपस्थित कलावंतांनी गीत सादरीकरण केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कडुबाई खरात, मीरा उमप यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या मान्यवरांचाही गौरव यावेळी करण्यात आला. त्यामध्ये जयश्री सोनकवडे, सीमा पाटील, जॉली मोरे, कुणाल वराडे, सरला तायडे, बाबासाहेब सुतारे, उत्तमराव दाभाडे, कवी सुदाम मगर, प्रमोद उमाळे, सुरज सोनवणे आदींना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमोद उमाळे निर्मित आणि बी. आर. प्रस्तुत विदर्भ म्युझिकल ग्रुपचा विषेश कार्यक्रम संपन्न झाला. अकोला जिल्हयातील तमाम आंबेडकरी गायक व गितकार यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विशाल नंदागवळी आणि आदेश आटोटे यानीं केले तर आभार संस्थेचे सचिव अमोल सिरसाठ यांनी मानले. यावेळी बाळापुर तालुक्यातुन महिला संघ मोठया संख्येने कार्यक्रमाला उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड. प्रशांत उमाळे, उत्तमराव दाभाडे, सुजर सोनवणे, रवी थेटे, राजेश अवचार, रत्नदीप वानखडे, अरविंद सिरसाट, जयशिल पाचपोर, सुशील वाकोडे, धनराज तावडे, विश्वजीत वानखडे आदींनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या