अकोला/प्रतिनिधी- बौद्ध धम्म समजुन घेतांना भन्ते अश्वजीत यांनी लिहिलेल्या लेखाचा संग्रह म्हणजे 'चरथ भिक्खवे चारिक' हा ग्रंथ समाजाला दिशादर्शक असा आहे. भन्ते अश्वजीत यांनी साध्या आणि सोप्या भाषेत धम्माचे विश्लेषण केले असुन सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीसाठी हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. एम.आर. इंगळे यांनी केले. ते (दि. १० सप्टेंबर रोजी) महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्था बाळापुर जि. अकोला आयोजित रमाई प्रकाशन प्रकाशित आणि अमरदीप वानखडे संपादीत "चरथ भिक्खवे चारिकं' (भन्ते अश्वजीत यांचे लेख) या ग्रंथावर परिसंवादाच्या कार्यक्रमातुन बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक तथा विचारवंत आ. कि. सोनोने हे होते तर या ग्रंथावर भाष्य करण्यासाठी पु. भदन्त धम्मबोधि थेरो, औरंगाबाद, भन्ते अश्वजीत, औरंगाबाद, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष
पी.जे. वानखडे, आय.ए.एस. अधिकारी विश्वनाय शेगांवकर आदी उपस्थीत होते.
पी.जे. वानखडे, आय.ए.एस. अधिकारी विश्वनाय शेगांवकर आदी उपस्थीत होते.
यावेळी बोलतांना धम्मबोधि थेरो म्हणाले की, भन्ते अश्वजीत यांनी या ग्रंथाद्वारे भिक्षु आणि उपासक यांना बौद्ध धम्माचे साध्या सरळ सोप्या आणि कोणालाही चटकन समजेल अशा भाषेत केलेले लेखन बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसार प्रणालीचा भाग आहे. आणि धम्माचा प्रचार प्रसार करणे हे उत्तम मंगल असल्याचे बुद्ध सांगतात.
भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पो.जे. वानखडे म्हणाले की, संपत्ती कमावल्यापेक्षा संपली निर्माण करणारी संतती निर्माण करा, अशी संतती निर्माण करण्यासाठी धम्माचरण महत्त्वाचे असुन भन्ते अश्वजीत यांनी धम्मसंस्कार वर्गाच्या माध्यमातुन नवीन पीढी घडविण्याचे कार्य हाती घेतले आहे.
माजी आय.ए.एस. अधिकारी विश्वनाथ शेगांवकर बोलतांना म्हणाले को, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला हा धम्मरथ समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य भन्ते अश्वजीत यांनी या ग्रंथाच्या निर्मितीतुन केले आहे.
अध्यक्षीय समारोप करतांना आ.कि. सोनोने म्हणाले की, बौद्ध धम्माच्या इतिहासात धम्माची चिकित्सा करणारा 'चरथ भिक्खवे चारिकं' हा पहिला ग्रंथ असुन धम्माची आणि समाजाची चिकित्सा करण्याचे धाडस भन्ते अश्वजीत यांनी केले आहे. ही एतिहासिक बाब असुन बौद्ध साहित्य आणि संस्कृतीचे जतन करणारी घटना आहे.
कविरत्न केरुजीबुवा गायकवाड सभागृह, अशोक वाटीका येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रमेश डोंगरे यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव अमोल सिरसाट यांनी मानले. यावेळी अकोला जिल्हयातील आंबेडकरी साहित्यिक, साहित्यप्रेमी मोठया संख्येने उपस्थीत होते.
0 टिप्पण्या