डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन - भन्ते अश्वजीत, औरंगाबाद

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन - भन्ते अश्वजीत, औरंगाबाद

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्या
तील येवले येथे जाहीर घोषणा केली होती की, "दुर्दैवाने मी हिंदू म्हणून जन्माला आलो कारण ते माझ्या हातात नव्हते परंतू मी हिंदू म्हणून कदापिही मरणार नाही." ही घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष सिद्ध करतो की ते हिंदू समाजाने अस्पृश्यांवर लादलेल्या अन्यायाचे परिणाम आहेत. ज्या महामानवाने समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, धर्म आणि मानवी हक्क याविषयी अगाध ज्ञान प्राप्त केले होते. असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा जिद्दी, उद्योगी आणि धोरणी माणूस ज्या समाजात आणि ज्या धर्मात माणसांना समान वागवले जात नाही. त्या समाजात जगत राहणे केवळ अशक्य होते. सर्व मानव जन्माने समान आहेत. या नैसर्गिक तत्वावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृढविश्वास होता. त्यांना याची पूर्ण जाणीव होती की, व्यक्तीची योग्यता ही तिच्या विद्वत्तेवर, ज्ञानावर, आचरणावर आणि समाजातील व्यक्ती प्रती असलेल्या त्याच्या भावनांवर अवलंबून असते. अशी मानसिकता झालेल्या माणसासाठी असमानतेवर आधारलेल्या हिंदू धर्माचा त्याग करणे ही नैसर्गिक बाब होती. ह्या संदर्भपिठीकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल्या पाच लक्ष अनुयायांना दीक्षा दिली. हा सोहळा दिन म्हणजे समस्त अस्पृश्यासाठी सोनियाचा दिन ठरला आणि तेंव्हापासून बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध धम्म मिशन सुरू झाले.

 बुद्ध धम्म हा तर्क, न्याय, प्रत्यक्ष अनुभूती  विश्वातील मूलभूत तत्वावर आधारलेला आहे. आणि हा धम्म माणसाने माणसासाठी सर्व प्राणिमात्रासाठी शिकविला असल्यामुळे तो दैवी चमत्कृतीवर व  साक्षात्कारावर अवलंबून नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आकृष्टपणे स्वीकारला. कारण नव्वद  टक्के लोक दु:खात जगत आहेत. या वंचित आणि गरीब लोकांचे दुःख दूर करणे हा बुद्ध धम्माचा प्रमुख उद्देश आहे. म्हणून बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भवितव्य धम्माचा प्रचार व प्रसार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर आपल्या अनुयायांना धम्माच्या मार्गावर आरूढ करणे, त्यांना सदाचारी होण्यास प्रवृत्त करणे. अष्टांगिक मार्गाचे पालन करून त्यांचे आचरण चांगले करणे आणि त्यामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य मिळविणे हा होता. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश म्हणजेच त्यांचे बुद्ध धम्म मिशन होय. बौद्ध अनुयायांना बुद्ध धम्म शिकविणे आणि त्यांच्या अष्टांगिक मार्गाच्या आचरणातून बुद्ध संस्कृती निर्माण करणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म मिशनचा केंद्रबिंदू होता. त्या अनुषंगाने बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर धम्म मिशनरी होण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मानस त्यांनी स्पष्ट केला. धम्म मिशनरीमध्ये प्रत्येक माणसाने शील, करुणा, शांती आणि क्षमा या तत्त्वाप्रमाणे जीवन जगून जगात प्रेम आणि शांतीचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे .
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर १९५६ रोजी अनुयायांसमोर भाषण केले. त्या भाषणातील  अंश धम्म मिशनच्या संदर्भात पुढील प्रमाणे आहेत:-
 १) धम्मदीक्षेनंतर आपण मानवाला पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत.
२) ज्यांना अजून बुद्ध धम्मात यावयाचे आहे, त्यांनी आले पाहिजे त्यांना धम्म पटला पाहिजे.
३) माणसाच्या उत्साहाला काही कारण असेल तर मन शरीराच्या विकासाबरोबर मनाचाही विकास  होणे आवश्यक आहे.
 ४) धम्म पटवून देणे हे काम सोपे नाही. एका माणसाचे काम नाही. मला अधिक आयुष्य मिळाल्यास मी योजलेले काम पूर्ण करीन.
 ५) धम्माची आवश्यकता गरिबांना जास्त आहे. कारण धम्म आशावाद शिकवितो.
६) धम्माचा प्रचार करणारे अभ्यासू विद्वान लोक नसतील तर धम्माला ग्लानी येईल.
७) विरोधकांशी वादविवाद करण्यास प्रचारक सिध्द नसतील तरीही धम्माला ग्लानी येईल.
८) धम्म आणि धम्माची तत्वे विद्वानांसाठी असतात आणि सामान्य लोकांकरिता विहारे असतात.
९) तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मानसन्मान वाटेल अशी कृती तुम्ही केली पाहिजे.
१०) धम्माचे सर्व प्रकारे ज्ञान तुम्हाला करून देणे हे माझे कर्तव्य आहे. मी पुस्तके लिहून तुमच्या शंका-कुशंका दूर करील व ज्ञानाच्या पूर्ण अवस्थेला तुम्हाला नेण्याचे सर्व प्रयत्न करीन.
 ११) आपण उत्तम रितीने धम्म पाळण्याचा प्रयत्न केल्यास. आपण देशाच्या आणि विश्वाच्या विकासाचे पाईप होऊ शकतो.
१२)  म्हणून आपण उत्तम प्रकारे धम्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. 
१३)आपण आपल्या मिळकतीचा  पाच टक्के हिस्सा धम्म कार्यासाठी दान केला पाहिजे. 
१४) प्रचारासाठी आपल्याला फळी निर्माण करणे आवश्यक आहे. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले पुढील जीवन धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी वाहून घेण्याचे ठरविले होते. हे स्पष्ट होते.
 धम्माचा प्रचार प्रसारासाठी मिशनरी होण्याची त्यांनी प्रतिज्ञा होती. त्या अनुषंगाने त्यांनी राजकारणापेक्षा धम्मात अधिक रस असल्याचे सांगितले होते. पुढे त्यांनी असा खुलासा केला की त्यांच्या अनुयायांनी धम्माचे काटेकोरपणे पालन करावे.धम्माचे काटेकोरपणे पालन करणे म्हणजे शील,प्रज्ञा आणि करुणा या तत्वानुसार जीवन जगणे होय. थोडक्यात अष्टांगिक मार्गाचे पालन करणे होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म मिशनचे प्रयोजन संक्षिप्तपणे असे की,
१) विज्ञानावर आधारित धम्म स्वीकारणे आणि नैसर्गिक सत्य, न्याय आणि तर्क यावर आधारित धम्म स्विकारणे.
२) शील, सदाचार आणि अष्टांगिक मार्ग यावर आधारित धम्म स्विकारणे.
३) धम्मानुसार आचरण करून समाजात वरचे स्थान प्राप्त करणे.
४) देशाच्या आणि जगाच्या उत्कर्षासाठी झटणे आणि माणसांनी माणसाला पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणे.
५) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशी अपेक्षा केली होती की, त्यांचे अनुयायी जागरूकपणे धम्माचे पालन करतील आणि धम्म  प्रचारासाठी यंत्रणा उभी करतील.
६) त्यांनी अशी अपेक्षा केली होती की, त्यांचे सुशिक्षित अनुयायी धम्म प्रचार- प्रसाराच्या कामी स्वतःच्या परिश्रमाने पावले उचलतील.
७) त्यामुळे त्यांच्या अनुयायांचे  कर्तव्य ठरते की त्यांनी त्यांची शक्ती धम्माचा अभ्यास, पालन आणि प्रचार आणि प्रसारासाठी खर्ची घालावी.
८) दैनंदिन जीवनात धम्मानुसार आचरण करणे हे सर्वांचे कर्तव्य ठरते.  धम्मपालनासाठी आधी धम्म शिकणे आवश्यक आहे.
 ९) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खात्री होती की, त्यांचे अनुयायी अष्टांगिक मार्गाचे योग्य प्रकारे पालन करून जीवनाच्या सर्वच क्षेत्रात नक्कीच प्राविण्य मिळवतील.
१०) म्हणून धम्म शिकून आणि त्यानुसार दैनंदिन जीवनात आचरण करून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास सार्थ ठरविला पाहिजे. म्हणून धम्म समजून घेणे आणि त्यानुसार आचरण करणे हे सर्वांचे कर्तव्य ठरते. यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन समाविष्ट आहे. आणि त्याचे अनुकरण करणे क्रमप्राप्त ठरते.
        
भन्ते अश्वजित
सदधम्म बुद्धविहार,आरतीनगर,औरंगाबाद
मो.नं. ९६७३२९२२९७.

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या

अरिय ISSN 2350-0131 म्हणाले…
साधू साधू साधू
Unknown म्हणाले…
आज खरी गरज आहे की एक पुढारी, एक नेतृत्व, एक झेंडा आणि फक्त आणि फक्त एकच संघाठण. ते ही बाबासाहेब यांच्या सारखे.
इतके पक्ष आणि इतके नेते झाले की कोणाला समर्थन करावे?
सगळा बुद्धिष्ट धर्म ( इतर ज्याला समाज संबोधतात) आज गोंधळलेल्या अवस्थेत आहे.
हा माझा व्यक्तिगत विचार आहे.
Unknown म्हणाले…
🙏
"वंदामी भन्ते" ...,
*"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन"*
हा लेख वाचून पुन्हा एकदा स्फूर्ती निर्माण झाली..,
जे आपण स्पष्ट उल्लेख करून सांगितलं की ,
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी" अशी अपेक्षा केली होती की, त्यांचे अनुयायी जागरूकपणे धम्माचे पालन करतील आणि धम्म प्रचारासाठी यंत्रणा उभी करतील. सुशिक्षित अनुयायी धम्म प्रचार-प्रसार साठी पावले उचलतील...!
पन आज जो~तो (मी सुध्दा) या संसाराच्या माया जाळात अडकलेला आहे या दिसतोय..,
ऐवढ नव्हे तर "डॉ.बाबांसाहेब आंबेडकर" यांच्या उपकाराची कल्पना तर दूरच परतफेड कशी करता येईल हे सुध्दा विचार आता येईना..भ्रमसाठ पैसे,गाडी,बंगला,नवनवीन मित्र अण् त्यांच्या चालीरिती अंगिकारतोय हे कळते पन वळत नाही..!
"बाबा" तुम्ही दिलेल्या *22 प्रतिज्ञा* कधी स्विकारल्याच नाही..!
फक्तच ओठानीच पुटपुटल्या..!
आदरणीय "भन्तेजी"
हा लेख जो कुणी अभ्यासेल तो पुन्हा एकदा भरकटलेल्या वाटेला सोडून व आपल्या कर्तव्याची जाणीव करून त्यांची शक्ती धम्माचा अभ्यास, पालन आणि प्रचार आणि प्रसारासाठी खर्ची करील..!
अशी अपेक्षा करतो..!
(टिपः- ज्या कुणाचे मन दुखावले गेले असेल त्यांना क्षमा याचना करतो..,
आणि जे "22 प्रतिज्ञा" प्रमाणे आचरण करतात त्यांना धन्यवाद..!)
...🖋बौध्दाचार्य सुरेंद्र वानखेडे (पुणे)
Manik More म्हणाले…
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Manik More म्हणाले…
डॉ बाबासाहेब यांनी दीक्षा घेतल्यानंतर बांधवांना उद्देशून सांगितले होते की "आता मला राजकारण सोडून धम्म मिशन मध्ये पुढील आयुष्य घालवायचे आहे..! व या धम्म मिशन ची जबाबदार ही शिकलेल्या लोकावर जास्त प्रमाणात आहे..!" म्हणून त्यांनी काही दिवसातच पंडित नेहरूंना बुध्द धम्म दीक्षा देण्याचा कार्यक्रम ठरविला होता परंतु या कारणामुळेच त्यांचा संदिग्ध परिस्थिती महापरिनिर्वाण झाले, व देश खऱ्या धर्मापासून वंचित राहिला. शिकल्यानी आपली जबाबदारी घेतली नाही, गद्दरी केली त्याची फळे गरीब समाज भोगत आहे..! बुद्ध सांगतात क्षणिक आसक्ती ही दुःखाची जननी आहे, म्हणून ह्या क्षणिक temporary greeds सोडून ज्या समाजात वाढलो त्या समाजाला परत काय दिले..? म्हणून बुद्ध म्हणतात तुमचं जन्म हा परत फेडीसाठी असतो, तुमचा जन्म हा तुमच्या चांगल्या "कर्मा" मुळे झालेला आहे, म्हणून प्रथम कुटुंबाला, समाजाला व नंतर आपोआप राष्ट्राला सेवा देणं होय, ही वैश्विक शिकवण फक्त बोधिसत्वच देवू शकतात..! स्वतःचा उद्धार करून दुसऱ्यांचा ही उद्धार करणे या साठीच मनुष्य जन्म आहे व हाच तो भगवान बुद्धांचा महान सिद्धांत म्हणजे प्रत्युत समुतपाद, कार्यकारणभाव, Cause & Effect..! "पुण्य संपादित केले तर पुण्याचं मिळणार" बुद्ध धम्म संपूर्णपणे याच महान तत्वावर आधारित आहे. घरोघरी जावून प्रचार प्रचार करणे हे प्रत्येक शिकलेल्या लोकांचे प्रथम कर्तव्य आहे, ते या समाजातील लोकांनी ओळखले पाहिजे..! rss या संघटनेकडे पाहिले तर ते लोक आपल्या "धर्म कर्तव्याचे" पालन करत आहे, ते त्यांच्या समाजासाठी वेगवेगळ्या माध्यमातून "त्यांच्या धर्माचा प्रचार प्रसार करत आहेत..! आणि आम्ही स्वार्थात, आसक्तीत वाहत चाललो आहोत..! लोकसभेत आमचा प्रतिनिधी किंवा "आपापल्या छ्यावण्यातील नेता" एकमेकांची तोंड ही पहात नाही, याची जरासी लाज ही वाटत नाही..! म्हणून आज देशावर rss राज्य करत आहे..! आणि या लोकानीच समाज असंघटित केला आहे..! समाजाच्या अनेक समस्या "मिलिंद प्रश्न" यातून सुटू शकतात..! हे शिकलेल्या लोकांनी ओळखले पाहिजे..! असे जर होत नसेल तर प्राण्यात आणि आपल्यात काही एक फरक नाही, केव्हातरी त्याचा "बकरा" होणारच..! हाच तो कॉज अँड इफेक्ट होय..!