३१ ऑगस्टला पंढरपुरात विठ्ठल मंदिर खुले करण्यासाठी वंचितचे आंदोलन
पुणे/प्रतिनिधी:- राज्य सरकारने ३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले केले नाही तर त्या ठिकाणी वारकरी, महाराज यांच्यासह लाखो लोकांच्या मदतीने आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्यानंतर पुणे जिल्ह्यातुन या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारिपचे पुणे जिल्हाअध्यक्ष (पश्चिम) उत्तमदादा वनशिव यांनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर राज्यातील एसटी, बस सेवा चालू करण्यात आली. पानटपऱ्या केस कर्तनालय यांची दुकाने व इतर व्यवसाय सुरू झाले. मात्र मंदिर अद्यापही बंद आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांनी शासनाला इशारा दिलेला आहे की, ३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले झले नाही तर लाखो वारकरी ३१ ऑगस्ट रोजी मंदिर प्रवेश करतील. त्यामुळे पुणे जिल्हा, पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्ह्यातील सर्व तालुके, महिला आघाडी यांची सर्व कार्यकारणी, कार्यकर्ते यांना सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता मुख्य प्रवेशद्वार विठ्ठल मंदिर, पंढरपूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारिपचे पुणे जिल्हाध्यक्ष (पश्चिम) उत्तमदादा वनशिव, बाबासाहेब कांबळे जिल्हाध्यक्ष पुणे (पूर्व) भारिप, रामभाऊ मरगळे जिल्हाध्यक्ष पुणे (पश्चिम) वंचित बहुजन आघाडी, अप्पासाहेब गायकवाड जिल्हाध्यक्ष पुणे (पूर्व) वंचित बहुजन आघाडी, सिमताई भालेसेन जिल्हाध्यक्ष महिला आघाडी भारिप, अतुल बहुले मा.अध्यक्ष, पुणे शहर, भारिप, मन्नावरभाई कुरेशी अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी पुणे शहर, देवेंद्र तायडे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी पिं.चिं. शहर, अनिताताई चव्हाण महिला अध्यक्ष पुणे शहर भारिप, प्रज्ञावंत ओव्हाळ महासचिव, पुणे जिल्हा पश्चिम भारिप, अंबादास ओव्हाळ उपाध्यक्ष पुणे जिल्हा पश्चिम भारिप, संतोष लोखंडे उपाध्यक्ष पुणे जिल्हा पश्चिम भारिप, राहुल काळे उपाध्यक्ष पुणे जिल्हा पश्चिम भारिप, राजेंद्र भोसले संघटक पुणे जिल्हा पश्चिम भारिप, नवनीत आहिरे प्रसिद्धी प्रमुख भारिप पुणे जिल्हा, अजित पानसरे संघटक, भारिप बहुजन महासंघ, पुणे शहर समस्त जिल्हा व तालुका कार्यकारणी भारिप बहुजन महासंघ, पुणे जिल्हा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या