अमरावती/प्रतिनिधी:- भारतीय स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय स्त्रियांनी सर्व क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली असली तरी या व्यवस्थेचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही बदललेला दिसत नाही. ती अनेक अत्याचाराला व शोषणाला बळी पडतांना दिसते. किंबहुना हेच आपलं जीवन अशी तिची मानसिकता बनते. ही शोषणमूल्य बदलावीत. स्त्रियांमध्ये सवांद व्हावा. सवांद केवळ स्त्रियांन मध्येच नाहीतर समताधिष्टित स्त्री-पुरुषा मध्ये ही संवाद साधने गरजेचे आहे. त्याकरीता "मुक्तमंथन" हे त्रैमासिक उल्लेखनीय कार्य करेल असा आशावाद प्रा. सतेश्वर मोरे यांनी त्रैमासिक मुक्तमंथनच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभात व्यक्त केला.
या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बी.आर. वाघमारे, माजी परीक्षा नियंत्रक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. लीलाताई भेले, निवृत्त प्राध्यापिका, बाबासाहेब पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा, जयश्री सोनकवडे (जाधव), उप आयुक्त सामाजिक न्याय विभाग पुणे, तसेच प्रा. विजयकुमार गवई, निवृत्त उपविभागीय संचालक सूचना प्रसारण मंत्रालय, भारत सरकार हे होते. हया प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना डॉ. बी. आर. वाघमारे म्हणाले की, स्त्रियांचे मूलभूत योगदान असतांना सुद्धा ती अजूनही मागे राहिली ही खेदाची बाब आहे. यावेळी लीलाताई भेले यांनी स्त्रियांची भूमिका कशी असावी. आता या काळात तिने स्वतःला कसे सिद्ध करावे हे आवर्जून सांगितले. तर जयश्री सोनकावडे यांनी दोघांच्याही मानसिकतेत बदल करून समता प्रस्थापित करून माणूस म्हणून स्वीकारणे काळाजी गरज आहे असा मार्मिक विचार पुढे ठेवला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनंदा बोदिले, संपादक मुक्तमंथन यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. चंद्रकांत सरदार सहसंपादक मुक्तमंथन यांनी केले. सूत्रसंचालन संदीप राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन करुणा खांडेकर यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. रवींद्र मुंदरे, डॉ. चरण जनबंधु, डॉ. लालचंद बोदिले, डॉ. वामन गवई, डॉ. अशोक इंगळे, सुदाम सोनूले, डॉ. आशा थोरात, प्रकाश बनसोड, डॉ. अंबादास घुले, शिवा इंगोले, डॉ.गजानन हिवराळे, सरिता सातरडे इत्यादी बरिच नामवंत साहित्यिक व मान्यवर मंडळी ऑनलाईन उपस्थित होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुक्तमंथन या त्रैमासिकच्या सर्व टीमचे सहकार्य लाभले. टेक्निकल बाब संदीप राऊत यांनी पूर्णतः सांभाळून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला...
0 टिप्पण्या