अकोला/प्रतिनिधी :- डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत देण्यात येणारी शैक्षणिक सत्र २०१९-२०ची शिष्यवृत्ती तात्काळ विद्यार्थ्यांनादे ण्यात यावी ह्या मागणीचे निवेदनम हाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजीठा करे व समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे ह्यांना ई मेल द्वारे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी दिले होते व त्या अनुषंगाने वारंवार पाठपुरावा करून असंख्य विद्यार्थ्यांना स्वाधार शिष्यवृत्ती न मिळाल्याने येत असलेल्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या त्याच अनुषंगाने समाजकल्याण विभाग अकोलाकडून तरतुदी साठी मागणी सुद्धा करण्यासाठी आग्रही राहून विद्यार्थ्यांना त्याचा लवकर लाभ व्हावा अशी मागणी घेऊन अखेर ती पूर्ण केली असून २८ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्यासाठी ३५ कोटी रुपयांचीतरतूद मंजूर करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा व समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे ह्यांनी मागणी मान्य केल्यामुळे त्याचे आभार मानले.
0 टिप्पण्या