Social24Network
गरजू विद्यार्थ्यांसाठी सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या नावे मोफत कोचिंग क्लासेसला सुरुवात...
मुंबई/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी कुर्ला विधानसभा, मेत्ता संस्था आणि स्वप्नील जवळगेकर यांच्या पुढाकाराने हनुमान नगर कुर्ला पुर्व येथे गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर मोफत कोचिंग क्लासेसची सुरुवात करण्यात आली आहे.
या क्लासमधे ३० विद्यार्थी असून दोन बॅच मधे क्लास घेतले जात आहे. अशा प्रकारचे मोफत क्लासेस चालू करण्यासाठी सुप्रिया मोहिते, सारीका जवळगेकर यांचे विशेष सहकार्य लाभले तर अनिल मस्के, शैलेश सोनावने, अमोल पगारे, स्वप्नील जवळगेकर आदींनी पुढाकार घेतला आहे.
0 टिप्पण्या