बिहार निवडणुक : आठवलेंची एनडीएकडे ५ जागांची मागणी, अन्यथा स्वबळावर
बिहार विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात एनडीएचा घटक म्हणून रिपब्लिकन पक्षाला ५ जागा दिल्या पाहिजेत. जर जागावाटप समाधानकारक झाले नाहीतर रिपब्लिकन पक्ष स्वबळावर बिहार विधानसभा निवडणुकीत १५ उमेदवार उभे करून उर्वरित जागांवर एनडीएला पाठिंबा देईल अशी घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पटना येथे रिपाइंच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. बिहार विधानसभा निवडणुकीत पुन्हा एनडीए चा विजय होऊन नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील. बिहार मध्ये भाजप जेडीयु प्रणित एनडीएची सत्ता येणार असून त्या सत्तेत रिपब्लिकन पक्षाला भागीदारी दिली जाणार असेल तर बिहार विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष उमेदवार उभे न करता सर्व जागांवर भाजप जेडीयु एनडीए च्या उमेदवारांना पाठिंबा देईल असे रिपाइं चे निवडणूक धोरण या बैठकीत ना रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या