टीम सोशल 24 नेटवर्क
‘वंचित’कडून पदवीधर मतदार संघाची उमेदवारी प्रा. प्रकाश इंगळे यांना?
सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत विद्यार्थ्यांची मतं
औरंगाबाद/प्रतिनिधी:- पदवीधर मतदार संघाची निवडणुक येत्या नोव्हेंबर महिण्यात होण्याची शक्यता वर्तवली जात असतांनाच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व पक्ष-संघटना कामाला लागल्या असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या निवडणुकीत विद्यार्थी नेते प्रा. प्रकाश इंगळे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्याला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून ‘‘अब की बार प्रकाशभाई आमदार’’ अशी हाक विद्यार्थ्यांनी दिली आहे. त्यामुळे जर वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली तर निकालाचे चित्र बदलू शकते. अशी शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादी क्राॅग्रेस पक्षाचे वर्चस्व असलेल्या या जागेवर वंचितने उमेदवार दिल्यास पवारांची डोकेदुखी वाढल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान प्रा. प्रकाश इंगळे हे गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढत आहेत. अनेक आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविले आहेत. 2016 च्या झालेल्या विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये त्यांनी तिस-या क्रमांकाची मते घेतली होती. त्यामुळे त्यांच्याकडे असणारा जनाधार पाहता या निवडणुकीत त्यांची पक्षश्रेष्ठी दखल घेतील का? याकडेही सर्वांचे लक्ष वेधले आहे.
प्रकाश इंगळे यांच्या बद्दल...
प्रा. प्रकाश इंगळे हे मुळचे भारिप बहुजन महासंघाचा बालेकिल्ला असलेल्या अकोला जिल्ह्यातील असून गेल्या 20-25 वर्षापासून औरंगाबादमध्ये स्थायिक आहेत. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कार्यकर्ता ते प्रदेश महासचिव पर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांच्या कार्याची पावती देणारा आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातुन त्यांनी ‘विद्यार्थी संसद सचिव’पदा पासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. तब्बल तीन वेळा निवडुन येणारे ते एकमेव विद्यार्थी ठरले आहेत. महाविद्यालयीन राजकारण करतांनाच त्यांनी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी कंबर कसली. विविध प्रश्नांवर आवाज उठविला. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ते आवाज बनले. 2013 मध्ये झालेल्या विद्यापीठ संसद निवडणुकीमध्ये दलित, बहुजन संघटनांनी एकत्र करून विद्यापीठाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवण्यामध्ये प्रा. प्रकाश इंगळे यांची महत्त्वाची भूमिका होती. विद्यार्थ्यांमध्ये मिसळणारा, त्यांना आपलासा वाटणारा, हक्काचा माणुस म्हणजे प्रकाश इंगळे अशी त्यांची प्रतिमा आहे.
भीमोवातुन विद्यार्थ्यांचे एकीकरण
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरूवातीला एकच दिवस भीमोत्सव साजरा केल्या जात होता. परंतु प्रा. प्रकाश इंगळे यांच्या प्रयत्नांमुळे भीमोत्सव 1 ते 14 एप्रिलपर्यंत साजरा केला जातो. अनेक मान्यवरांना व्याख्यानासाठी बोलावल्या जाते. युवक महोत्सव या दरम्यान साजरा केल्या जातो. त्यामुळे अनेक कलावंत/कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा हा उपक्रम ठरला आहे. यासह रमाई जयंती महोत्सव, रक्तदान शिबीर आदी अनेक उपक्रम सातत्याने प्रा. प्रकाश इंगळे राबवितात. त्यातुन विद्यार्थ्यांचे व्यापक संघटन करण्यास त्यांना यश आले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांचा दांगडा संपर्क असलेल्या प्रा. प्रकाश इंगळे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी द्यावी असा सुर विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर लगावला आहे.
0 टिप्पण्या