'वंचित'च्यावतीने वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन!
पिंपरी चिंचवड/प्रतिनिधी:- वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहरच्यावतीने भोसरी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर वीज बिलाची जाहीर होळी करण्यात आली. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत राज्याचे ऊर्जा मंत्री यांना निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये प्रामुख्याने लॉकडाउन काळातील मार्च ते सप्टेंबर 2020 पर्यंतचे घरगुती तसेच सुक्ष्म,मध्यम व लघु उद्योजक वीज ग्राहकांचे संपुर्ण वीज बिल माफ करण्यात यावे. ऑक्टोबर 2020 पासुन पुढील वीज बिलावर त्यांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवठा व त्या पुढील वीजेसाठी प्रति युनिट वीज दर कमी करण्यात यावेत. या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. कोरोना वैश्विक महामारीमुळे राज्याची नव्हे तर संपुर्ण देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असुन याची सर्वाधिक फटका महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिक व सुक्ष्म,मध्यम व लघु उद्योजक यांना बसला आहे.
महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक तसेच राज्यातील सुक्ष्म,मध्यम व लघु उद्योजक यांच्यावर उपासमारीची वेळ आली असुन याचा त्रास त्यांच्या व्यवसायासह त्यांच्या कुटुंबाला देखील सहन करावा लागत आहे. लॉकडाउनमुळे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले असुन उदरनिर्वाहाचा फार मोठा प्रश्न या वर्गासमोर निर्माण झाला आहे. केंद्र व राज्य पातळीवरून देखील यांना ठोस अशी आर्थिक मदत मिळालेली नाही. अशी सर्व आर्थिक अडचणीची परिस्तिथी असताना महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाकडूनदेखील सर्वसामान्य नागरिक व सुक्ष्म,मध्यम व लघु उद्योजकांच्या अडचणीत भर घालण्याचे व आर्थिक स्तरावर त्यांना छळण्याचे काम चालु आहे. ज्यामध्ये वाढीव वीजदर,अव्वाच्या सव्वा वीज बिले आकारून या वर्गाच्या आर्थिक अडचणी वाढवण्याचे काम महाराष्ट्र राज्य विदुयत विभाग सध्या करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वरील मागण्यांवर तात्काळ कारवाई करीत सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात, अन्यथा वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर घरगुती तसेच सुक्ष्म,मध्यम व लघु उद्योजक वीज ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही असा इशारा देखील निवेदनात ऊर्जा मंत्र्यांना देण्यात आला.
आंदोलनाचे नैतृत्व वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मा. इंजि. देवेंद्र तायडे यांनी केले, तर यावेळी शहर प्रवक्ता के. डी. वाघमारे, महासचिव रहीम भाई सय्यद, कोषाध्यक्ष राजेश बारसागडे, बबन सरोदे,उपाध्यक्ष सनी गायकवाड,बबन सरोदे,शांताराम खुडे,अतुल भोसले, राजन नायर, सुनीता शिंदे, निर्मला कांबळे, शारदा बनसोडे, भीमाशंकर शिंदे, शरद वाघमारे, प्रीतम कांबळे, चंद्रकांत गायकवाड, राहुल बनसोडे, कमलेश वाळके,शशिकुमार टोपे,विजय गेडाम, कमलेश वाळके, इंद्रसेन गोरे,गुलाब पान पाटील, संतोष जोगदंड, अशोक शिवशरण,धनंजय कांबळे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या