कोणतीही कमिटी नेमण्याची गरज नाही ; पिडित तरूणीच्या जबानीवरून आरोपींना तात्काळ शिक्षा द्या - अँड. प्रकाश आंबेडकर

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोणतीही कमिटी नेमण्याची गरज नाही ; पिडित तरूणीच्या जबानीवरून आरोपींना तात्काळ शिक्षा द्या - अँड. प्रकाश आंबेडकर

कोणतीही कमिटी नेमण्याची गरज  नाही ; पिडित तरूणीच्या जबानीवरून आरोपींना तात्काळ शिक्षा द्या 
 - अँड. प्रकाश आंबेडकर

Social24Network

महिलांना सुरक्षा न देवू शकणारे उत्तरप्रदेश सरकार कुचकामी असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सरकारने या प्रकरणी जनतेची दिशाभूल न करता पिडित तरूणीने दिलेल्या जबानीवरून आरोपींना अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.  

उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी एका दलित युवतीवर गावातील सवर्ण तरुणांनी अत्याचार करून तिच्या पाठीचा कणा तोडला व जीभ कापली त्यानंतर तिला शेतात मेली आहे असे समजून टाकून दिले. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर काल या तरुणीने दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.  

उत्तर प्रदेशमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत असून यावरून अस स्पष्ट होते की, उत्तर प्रदेश सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही, अशा योगी सरकारचा आम्ही धिक्कार करतो. महिलांसोबत कोणी काहीही करू शकतो अशी मानसिकता झाली आहे. लोकांनी आता या प्रकरणावर बोलले पाहिजे. या प्रकरणात सरकारने एसआयटीची नेमणूक करायची काहीही गरज नाही. यातील आरोपींची नावे पीडित तरुणीने घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणी लोकांची दिशाभूल करण्याची गरज नसून मुलीच्या जबानीवरुन आरोपींना अटक केली आहे. त्यांना कठोर शासन करा. ही आमची मागणी आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या