जाहीर निषेध (कविता) - प्रविण विरघट
2006/मध्ये खैरलांजी मध्ये पूर्ण देशाला हादरा देणारी घटना घडली...
माणुसकी इथे मातीत लोळताना संपूर्ण देशाने बघितली...
पण आजही कुठे कुठे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य घडत आहेत
दोष कुणाला द्यायचा....!
हेच मात्र अजूनही समजले नाही?
गरीब कुटुंबात जन्माला आलोय म्हणून?
खालच्या जातीत जन्मलो म्हणून?
शाहू फुले आंबेडकरांनी दिलेल्या मार्गाचं अनुकरण करतो म्हणून...
आजही कळत नाही दोष कुणाला द्यायचा.....?
महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचं
अन्याय मात्र सतत चालू ठेवायचं
येणारी व असलेली सरकारे ताठ मानेने स्वतः माणुसकीचे रक्षक म्हणून संबोधतात
पण कर्तव्य आजही कुचकामी ठरतात......
अन्याय झाला की आम्ही न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतो व आम्हालाच नक्षली ठरवतात...
किती दिवस, कोणा कोणाला तोंड देणार...
तोंड देता देता आमचे तोंड ही फोडले व दात ही पाडले!
एव्हड्याने शांत नाही झालात म्हणून जेलात तर कधी फासावर ही लटकाविले
शेपारकी एव्हडी केली की ज्या गावात माणुसकीला डाग लागला...
त्याच गावाला महाराष्ट्र तंटा मुक्त पुरस्कार दिला
असे अन्याय कित्येक झाले आहेत पण मात्र त्रास सहन करणारा वर्ग मात्र एकच आहे
या असल्या हरामखोर वृत्तीचा जाहीर निषेध
भोतमांगे... परिवाराला विनम्र अभिवादन
प्रविण विरघट
जिल्हा अध्यक्ष बुलडाणा
सम्यक विद्यार्थी आंदोलन
0 टिप्पण्या