Social24Network
मनीषा वाल्मिकी हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी... - रामदास आठवले
मुंबई/प्रतिनिधी - उत्तरप्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात झालेल्या दलित समाजाच्या मनीषा वाल्मिकी हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जावा आणि सहा महिने ते एका वर्षाच्या आत या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रव्यापी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आठवले यांनी दिला आहे.
3 आक्टोंबरला आठवले मुख्यमंत्र्यांना भेटणार
या प्रकरणासंबंधी 3 आक्टोंबर रोजी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेवून याप्रकरणी तात्काळ तपास व्हावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी पिडित तरूणीच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीचे निवेदन देणार असल्याचे यावेळी आठवले म्हणाले.
0 टिप्पण्या