Social24Network
ज्येष्ठ साहित्यिक अँड. विमलसूर्य चिमणकर यांचे दुःखद निधन
सुदाम सोनुले, अमरावती
ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत अँड. विमलसूर्य चिमणकर यांचे आज सकाळी १०:०० वाजता कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे नागपुर येथे दुःखद निधन झाले. ते आंबेडकरी विचाराचे भाष्यकार म्हणून सुपरिचित होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडर द्वारा स्थापित समता सैनिक दलाचे ते मुख्य संघटक होते. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये ‘‘द्वितीय महायुद्ध’’ ‘‘डाॅ. आंबेडकर’’ हे पुस्तक खुप गाजले. तसेच ‘‘वर्तमानातील अंतद्र्वद्व: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व कार्ल माक्र्स’’ हे पुस्तक वैचारिकदृष्ट्या त्यांच्या प्रगल्भतेची साक्ष देणारं होतं.
नामांतर आंदोलन, रिडल्स आंदोलन, घटकोपर हत्याकांड आंदोलन यांमध्ये त्यांचा कृतीशील सहभाग होता. त्यांनी ‘‘दि पीपल’’ हे मासिक गेल्या 30 वर्षापासून चालविले आहे. त्यांच्या मागे 2 मुले व पत्नी असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीची न भरून निघणारी हाणी झाली आहे.
0 टिप्पण्या