अंबाजोगाई डाॅ. आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरण : आरोपींना तात्काळ जेरबंद करा अन्यथा दगड भिरकावणारा हात उखडला जाईल ; पॅंथर दीपक केदार

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अंबाजोगाई डाॅ. आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरण : आरोपींना तात्काळ जेरबंद करा अन्यथा दगड भिरकावणारा हात उखडला जाईल ; पॅंथर दीपक केदार

Social24Network

Ambajogai Ambedkar statue desecration case: Arrest the accused immediately or else the stone-throwing hand will be uprooted; Panther Deepak Kedar

बीड जिल्हा अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे काही अज्ञात समाजकंटकांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा निंदणीय प्रकार घडला आहे. या प्रकरणी दंगलखोर समाजकंटकांना तात्काळ जेरबंद करा अन्यथा दगड भिरकावणारे हात उखळून टाकण्याचा इशारा आँल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला आहे.

सोशल 24 नेटवर्कशी बोलतांना केदार म्हणाले की, बर्दापूर अंबाजोगाई येथे घडलेला प्रकार हा निंदणीय आहे. महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक महामानवांच्या पुतळ्याच्या विटंबना होत आहेत. याला सरकार जबाबदार असून आरोपींना सरकार मनोरूग्ण म्हणून सातत्याने पाठीशी घालत असल्यामुळे महाराष्ट्रात महामानव विटंबना सत्र सुरू आहे. सरकारने अशा समाजकंटकांच्या मुसक्या तात्काळ आवळ्याव्या अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. अंबाजोगाई येथे नव्याने मजबूत पुतळा तात्काळ बसविण्यात यावा. आणि गेल्या 6 महिन्यात झालेल्या विटंबना प्रकरणाचा राज्य सरकारने तात्काळ आढावा घेवून दोषींवर ठोस कारवाई करावी. अशी मागणी आँल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे.

Ambajogai Ambedkar statue desecration case: Arrest the accused immediately or else the stone-throwing hand will be uprooted; Panther Deepak Kedar

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या