सरकार एक जातीय दबावाखाली - अँड. प्रकाश आंबेडकरांची ठाकरे सरकारवर घाणाघाती टीका

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सरकार एक जातीय दबावाखाली - अँड. प्रकाश आंबेडकरांची ठाकरे सरकारवर घाणाघाती टीका


Social24Network

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सर्व प्रकारच्या भरती प्रक्रिया रद्द करण्यात याव्या अशी मागणी मराठा समाजाने केली होती. त्यानंतर सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर आंबेडकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकर यांनी हे सरकार एक जातीय दबावाखाली असल्याची टीका केली आहे. 

दरम्यान खा. संभाजी राजे छत्रपती, खा. उदयनराजे भोसले यांनी परीक्षा पुढे ढकलावी अन्यथा परीक्षा होवू देणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ११ आक्टोंबर रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे जाहिर केले. मात्र या निर्णयामुळे आंबेडकरांनी नाराजीची प्रतिक्रिया व्यक्त करतांना या प्रकरणावर तोडगा काढता आला असता परंतु सरकारने ही परीक्षा रद्द करून एका जातीचा विचार केला आहे. मात्र उर्वरीत ८५ टक्के जनतेचे काय? असा सवाल त्यांनी केला आहे.  

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आंबेडकर म्हणाले की, उठं सुठं कोणीही अतिरेकी भूमिका घेणार आणि सरकार त्याला घाबरून बळी पडेल असं हे सरकार आहे. या प्रकरणावर आंदोलनकत्र्यांशी चर्चा करून त्याला विश्वास दिला पाहिजे होता. तसे करण्यात सरकारला अपयश आले आहे. या परीक्षेमध्ये १५ टक्क्यांच्या भीतीला घाबरून सरकारने ८५ टक्के विद्याथ्र्यांवर अन्याय केला आहे. असा आरोप यावेळी अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

या कारणामुळे बाळासाहेब उदयनराजेंना ‘‘बिनडोक’’ म्हणाले...

प्रकाश आंबेडकर चुकीचे बोलले नाहीत ; खा. संभाजी राजे

हा तर संघ-भाजपाचा कट - श्रीमंत कोकाटे

बिनडोक म्हणजे शिवी नाही ; बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका समजून घ्या... - प्राचार्य म.ना. कांबळे

महामानवाच्या नातवाच्या आड याल तर फुटबाॅल केल्या जाईल - दीपक केदार यांचा इशारा...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या