भीमसैनिकांनी चैत्यभूमीच्या पत्त्यावर पोस्टकार्ड पाठवून बाबासाहेबांना अभिवादन करावे ; भीमराव आंबेडकर यांचे आवाहन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भीमसैनिकांनी चैत्यभूमीच्या पत्त्यावर पोस्टकार्ड पाठवून बाबासाहेबांना अभिवादन करावे ; भीमराव आंबेडकर यांचे आवाहन

Bhimsainiks should greet Babasaheb by sending postcards to the address of Chaityabhoomi; Appeal of Bhimrao Ambedkar

(फोटो - भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या फेसबुक वाॅलवरून)
Social24Network 

कोरोना माहामारीचे संकट अद्यापही टळले नाही. कोरोनावरील लस अजूनही तयार झालेली नाही. अशातच मुंबई व महाराष्ट्रामध्ये रूग्ण संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता महापरिनिर्वाण दिनी भीम अनुयायांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर न येता चैत्यभूमीच्या पत्त्यावर पोस्टकार्ड पाठवून अभिवादन करावे आणि शासनाच्या आदेशानुसार मास्क लावून आपल्या स्थानिक ठिकाणी अभिवादन करावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले आहे.  

या संदर्भात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी एक पत्र जाहिर केले असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी 1 ते 6 डिसेंबर या कालावधीत देशभरातुन लाखों भीम अनुयायी व जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभुमी येथे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. यावर्षी कोरोना महामारीचे संकट आले आहे ते अद्याप टळले नाही, कोरोनावरची लस अद्याप आलेली नाही. सद्यस्थितीत देशातील विविध शहरात कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत सुध्दा रुग्ण संख्येत वाढ होत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेवुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतातील तमाम भीम-अनुयायांना व जनतेला खालीलप्रमाणे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

1) भारतातील सर्व भीम अनुयायी व जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे न पेता, आपल्या स्थानिक ठिकाणी असलेल्या ( उदा. शहर, गाव, वार्ड, परिसर, बुद्ध विहार, स्मारक इत्यादी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व प्रत्येकाने घरातील फोटोला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करावे. या अभिवादनाचे फोटो व्हीडीयोज सोशल मिडियावर व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब चॅनेल्स व अन्य) पाठवावेत.

2) कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून स्थानिक ठिकाणी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना, प्रत्येकाने शासनाच्या आदेशानुसार मास्क लावुन, फिजिकल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करावयाचे आहे.

3) तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे पोस्टकार्ड डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभुमी या पत्त्यावर पाठवावे. चैत्यभूमीचे ट्रस्टी या नात्याने भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे निवडक वरिष्ठ पदाधिकारी व समता सैनिक दलाचे 100 निवडक सैनिक यांची पोलिस, प्रशासन यांच्या सोबत व्यवस्थेसाठी नेमणूक करण्यात येणार आहे.

तरी, भीम अनुयायांनी व जनतेने चैत्यभूमीमध्ये न येता, वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या स्थानिक ठिकाणी, घरीच अभिवादन करावे, ही नम्र विनंती. या पत्रावर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय महासचिव जगदीश गवई, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय सचिव एस. के. भंडारे, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव एन.एम. आगाणे, भिकाजी कांबळे आदींची नावे आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या