संविधान दिनी अ‍ॅड. आंबेडकरांचे सूचक आवाहन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

संविधान दिनी अ‍ॅड. आंबेडकरांचे सूचक आवाहन

Constitution Day Adv. Ambedkar's suggestive appeal to constitutionalists

फोटो बाळासाहेब आंबेडकर यांच्या ट्वीटरवरून
Social24Network

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी संविधान दिवसाच्या पाश्र्वभूमीवर सर्व भारतीय जनतेला शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. शुभेच्छा व्यक्त करतांनाच त्यांनी देशातील संविधानवाद्यांना सूचक आवाहन केले आहे. सद्यःस्थितीमध्ये संविधान धोक्यात असून सामान्य माणसांचे स्वातंत्र्य धोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तेव्हा संविधानवाद्यांनी संविधानाच्या रक्षणासाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर ट्वीटरच्या माध्यमातून देशातील संविधानवाद्यांना आवाहन करतांना म्हणाले आहेत की, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी माणसांना, माणुसकीला कैद करणारी वैदिक, ब्राम्हणवादी व्यवस्था उद्ध्वस्त करत प्रत्येकाचे व्यक्तिस्वातंत्र्य जपणारी व्यवस्था बाबासाहेबांनी लागू केली. महत्प्रयासाने, महात्यागाने मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी संविधानाच्या रक्षणार्थ सज्ज व्हा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

फोटो बाळासाहेब आंबेडकर यांच्या ट्वीटरवरून


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या