वाचनातून अधिकारी निर्माण होतील : प्रा. देवानंद पवार

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वाचनातून अधिकारी निर्माण होतील : प्रा. देवानंद पवार

गुणवंत विद्यार्थ्यांचा एक झाड आणि सन्मानपत्र देऊन केला गौरव

वाचनातून अधिकारी निर्माण होतील : प्रा. देवानंद पवार
Social24Network

अकोला/प्रतिनिधी:- वाचनातूनच अधिकारी निर्माण होतील आणि येणाऱ्या काळाशी कसा संघर्ष करावा याचे ही ज्ञान प्राप्त होईल त्यामुळे पुस्तकांशी मैत्री करणे अत्यंत महत्वाचे आहे, प्रत्येक क्षेत्रात नाव लौकिक केलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला महत्व देऊन मार्गक्रमण करावे व गावाचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन आंबेडकरी साहित्यिक प्रा. देवानंद पवार यांनी केले. ते पातूर तालुक्यातील पिंपळडोली येथे माणिकराव ताजने बहुउद्देशीय संस्था व सौ. शशिकला बाई ताजने सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील विविध क्षेत्रात प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभातुन बोलत होते. यावेळी ऍड. एम. एस. इंगळे, खडसे, पत्रकार संतोष गवई, अमित सबनीस, जेष्ठ कवी घुगे, संस्थेचे अध्यक्ष दीपक ताजने, तंटामुक्ती अध्यक्ष वर्धमान ताजने आदी उपस्थित होते.

प्रा. देवानंद पवार यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून वडील स्मृतिशेष मोहनराव लोभाजी पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दहा हजार रुपयांचे स्पर्धा परीक्षेचे पुस्तके वाचनालयाला दान दिली आहेत. याच अनुषंगाने विद्यार्थ्यांत ऊर्जा प्राप्त होण्यासाठी परिसरातील विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व एक झाडाचे रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी दिलीप सरकटे यांच्या कडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देण्यात आले. कार्यक्रमाला अनिल देशमुख, हिम्मतराव ताजने, योगेश देशमुख, नंदू ताजने, बाबुराव ताजने, संजय गवई, शे. जमीर शे. कदीर, सुरेश खुळे, चंद्रकला बाई पारस्कर, सीताबाई ताजने, शशिकला बाई ताजने, माणिकराव ताजने, कैलास आल्हाट, प्रताप तायडे, दिनकर खुळे, बंडू ताजने, मंगलकिशोर ताजने, बळीराम आल्हाट, रामकोर ताजने, डीगांबर सोनोने यांच्या सह गावातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे उत्कृष्ठ संचालन उद्धव मोरे यांनी केले तर आभार धम्मानंद ताजने यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या