पारोशाने नदी म्हणाली... (कवितेशी गप्पा... कॅफेतून - सायली घोटीकर)

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पारोशाने नदी म्हणाली... (कवितेशी गप्पा... कॅफेतून - सायली घोटीकर)


Marathi Sahitya Warta

(कवितेशी गप्पा... कॅफेतून हे सदर आम्ही आजपासून मराठी साहित्य वार्ताच्या वाचकांसाठी सुरू करीत आहोत. या सदराद्वारे प्रसिद्ध फोटोग्राफर तथा चित्रकार सायली घोटीकर या लेखन करणार आहेत. ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे यांच्या मार्गदर्शनात सुरू झालेल्या कवितेशी गप्पा... कॅफेतुन या उपक्रमाचे अनुभव आपल्याला या सदरातून वाचायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन प्रसिद्ध कवी संकेत अरूण म्हात्रे यांनी केले असून सदरील कार्यक्रमाची लिंक खाली दिली आहे. आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा...)


त्या तुक्याची गाथा नदीने जपली तिला आपण कुठे जपलं? आणि शेवटी नायगावकर म्हणतायत, या त्यांच्या कवितेची वही बुडवायला एक तरी डोह राहू द्या. नायगावकर असं हताशपणे म्हणतात तेच सहन होत नाही पहिले... ते तसे नाहीतच. पण संकेतचा कॅमेरा श्रावणातली रखरखीत उघडी बोडकी माळ जमीन दाखवतो तेव्हा त्या भावनेची भयाणता अंगावर येते. ओसाड उजाड ग्रे रंग उद्विग्न करतो आणि त्याबरोबर हे मोजके पण चपखल शब्द. खरं, काय केलंय आपण, जगाला सावली देणारे झाड ही दोन थेम्ब पाणी मागू लागते? काय लायकी राहिली माणसाची? हे झाड बघून खरंच वाईट वाटते. ते कड्यावर उभे आहे आणि मरत चाललंय यात कवी पूर्ण मानवजात एका कड्यावर येऊन थाम्बलीये असं म्हणत असावा. संकेतचा कॅमेरा हे विलक्षणरित्या टिपतो. जणू काही हे सगळं कोसळणार आहे, संपणार आहे. त्या अस्वस्थ करणाऱ्या फ्रेम्स कवितेत आत आत अधिकच खेचतात आपल्याला. 

अशोक सर "अभियंत्याला मुता म्हणालो" असं म्हणत जबरदस्त टोला हाणतात. आपल्या एकूणच राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर सहज बोलून जातात. घाव वर्मी लागतो पण. सरांचा आवाज आहेच तसा. त्यातले चढउतार आणि त्यांची देहबोली या कवितेला जिवंत करते. ते आक्रमक (aggressive) नाहीत पण त्यांचे शब्द आहेत. आणि हा जो कॅमेरा फिरतो वरून ओसाड रितेपण दाखवत... अंगावर काटा आणतो. व्हिडिओ सुरु होतो तोच रखरखीत काळ्या करड्या दगडाळ रस्त्यावरून आपली नजर फिरवत. पहिल्याच फ्रेमला कळतं की हे आनंदाचे गाणे नाही. वैराण वातावरणात कॅमेरा bird's eye view..... एका सुकलेल्या लाकडांच्या कसल्याशा बांधकामावरून कॅमेरा सर्रकन खाली येतो. नायगावकर खाली मान घालून बसलेले. त्यांचा कुर्ता तोच काय फक्त हिरवा पूर्ण फ्रेम मध्ये. कदाचित ते सकारात्मक विचार घेऊन आपल्याला जागे करायला आले आहेत. त्यांची सावली वाढत जाते, गडद हॊत जाते. या कवितेतला हा एकटेपणा त्रासदायक आहे. मागील कवितेप्रमाणे आनंदी नाही. 

डिरेक्टरने ती सावली आणि ते लाकडाचे बांधकाम असे काही जबरदस्त टिपले आहे, पूर्ण कविताच एका फ्रेम मध्ये सगळं सांगून जाते. तो वरून खाली येणारा कॅमेरा आणि हळूहळू कवीचा दिसणारा चेहरा ! डिरेक्टरची ही चौकट मला फार आवडली. शेवटी नदी पारोशीच राहिली. या काळातल्या या मुक्ताबाईच्या ओवीला रक्त चिकटले .... आणि आम्ही गाणी म्हटली... केवढा हा उपहास. आपण खरं आयुष्य जगतोय का? का फक्त हा दिखावा आहे ? एखाद्या मुखवट्यामागचा? ... आहे ! आणि कवीने तो ओरबाडून काढला आहे, अत्यंत कमी शब्दात !


कवी : अशोक नायगावकर 

डिरेक्टर : संकेत म्हात्रे 


-सायली घोटीकर 

प्रसिद्ध छायाचित्रकार तथा कवयित्री, मुबई





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या