‘‘वंचितांचे सत्ता उद्धारक बाळासाहेब आंबेडकर’’ पुस्तकाचे अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

‘‘वंचितांचे सत्ता उद्धारक बाळासाहेब आंबेडकर’’ पुस्तकाचे अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन

Publication of the book "Balasaheb Ambedkar, the savior of the deprived"

(फोटो प्राचार्य म. ना. कांबळे यांच्या फेसबुक वाॅलवरून)

Social24Network

विविध जाती धर्मातील, वंचित समूहांना सामाजिक, आर्थिक न्याय आणि राजकीय प्रतिनिधित्व देवून प्रकाश आंबेडकर यांनी वंचित समूहात आत्मभान आणि चेतना निर्माण केली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर पंचेचाळीस वर्षांपासून अखंडपणे कार्य करीत आहेत, सोशल इंजिनियरिंगचा त्यांचा प्रयोग हा वंचितांना संधी प्रदान करणारा ठरला आहे. सम्यक समाज संघ, भारिप, भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करणारे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिका सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्यात या भूमिकेतून फुले-आंबेडकर विद्वत सभेचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रा. डाॅ. रमेश इंगोले लिखित ‘‘वंचितांचे सत्ता उद्धारक बाळासाहेब आंबेडकर’’ या पुस्तकाचे प्रकाशन दि. १८ नोव्हेंबर २०२० रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते अकोला येथील ‘यशवंत’ निवासस्थानी झाले.  

या पुस्तकाला फुले आंबेडकर विद्वत सभेचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य म. ना. कांबळे यांची प्रस्तावना लाभली असून आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, संशोधक, विचारवंत आणि वंचित समुहासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार असल्याची प्रतिक्रिया पुस्तकाचे लेखक प्रा. डाॅ. रमेश इंगोले यांनी दिली आहे. याप्रसंगी डॉ. प्रा. रमेश इंगोले (फुले आंबेडकर विद्वत सभा अकोला जिल्हाध्यक्ष), प्रा. विजय आठवले, प्रा. सुरेश मोरे, प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, प्राचार्य डॉ. संतोष पेठे, मंदाताई शिरसाट, निरंजन भाऊ वाकोडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या