Social24Network
Balasaheb's tongue did not slip, does not slip and will not slip; If there is courage, the upper caste capitalists should have an open discussion - Principal M. N. Kamble
अँड. प्रकाश आंबेडकर कायद्याचे अभ्यासक आहेत. त्यांना दीर्घ असा राजकीय अनुभव आहे. शिवाय ते संविधान निर्मात्यांचे नातू आहेत. त्यामुळे जिभ घसरणे कशाला म्हणतात हे त्यांना चांगल्या प्रकारे महिती आहे. भारतीय जनता पक्षाच्या समर्थक माध्यमांनी कालपासून जे चित्र रंगविले आहे. त्याला कसलाही आधार नाही केवळ आंबेडकर द्वेषातुन चूकीच्या पद्धतीने वारंवार अँड. प्रकाश आंबेडकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दारूडा म्हटले असल्याचे दाखवित आहे. मीडिया ही उच्च जातीय भांडवलदारांची मक्केदारी झाली असून हिंमत असेल तर खुली चर्चा करा असे आवाहन फुले-आंबेडकर विद्वत सभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राचार्य म. ना. कांबळे यांनी केले आहे.
फुले-आंबेडकर विद्वत सभेचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य म. ना. कांबळे यांनी म्हटले आहे की, दि. २० ऑक्टोबर २०२० रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्हा दौरा केला. अक्कलकोट तालुका आणि सांगवी गाव येथे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या सोलापूर येथील पत्रकार परिषदेत अँड. प्रकाश आंबेडकर यांनी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरकारने मदत करावी म्हणून अनेक मागण्या केल्या. यासंबंधी सरकारला सल्लाही दिला.
Balasaheb's tongue did not slip, does not slip and will not slip; If there is courage, the upper caste capitalists should have an open discussion - Principal M. N. Kamble
या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रामुख्याने काही महत्त्वपूर्ण मुद्ये मांडले आहे ते समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामध्ये...
१) शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे अतिवृष्टीने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. दोन्ही घटकांना तातडीने मदत करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
२) शेतकऱ्यांना व शेतमजुरांना रुपये 5000 खावटी, उत्कृष्ट अन्नधान्य, साखर, तेल अनुदान सरसकट तातडीने वितरित करा.
३) नुकसान भरपाई देण्यासाठी पॅकेज जाहीर करा.
४) तीन पायांचे सरकार असून दोघे एकाचा पाय दाबत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्या ऐवजी साखर कारखान्यांना अनुदान देण्याचा घाट घातला जात आहे. असा आरोप त्यांनी महाराष्ट्र सरकार वर केला. मदत देण्यात टाळाटाळ होत असून राज्य आणि केंद्र सरकारचे एकमेकावर आरोप-प्रत्यारोप चालू झाले.
५) देशपातळीवर बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्था व वागणे दारुड्या सारखे झालेले आहे. देश विकायला काढला आहे. जसे दारुड्या हा व्यसनी असतो. दारू पीत असतो. त्याला कुटुंबाचे भान राहत नाही. दारू पिण्यासाठी तो बायकोला पैसे मागत असतो. बायकोने पैसे दिले नाही तर तो बायकोला मारतो. त्याला पैसे पुरत नाही. मग तो घरातील भांडी विकतो, वस्तू विकतो, घरही विकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीचे वागणे दारुड्या सारखेच आहे. त्यांनी देश विकायला काढला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान नाही. दारुड्या आहे.
Balasaheb's tongue did not slip, does not slip and will not slip; If there is courage, the upper caste capitalists should have an open discussion - Principal M. N. Kamble
मीडियाचा खोडसाळपणा : मराठी मिडिया टीव्ही चॅनेल मुद्दा क्रमांक पाचची बातमी देताना सविस्तर बातमी संदर्भासह दिली नाही. त्यात खोडसाळपणा केला. प्रकाश आंबेडकरांची जिभ घसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दारुड्या म्हणाले. अशी ब्रेकिंग न्यूज केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वागणे दारुड्या सारखे आहे. त्यांनी देश विकायला काढलेला आहे. नरेंद्र मोदी दारुड्या सारखे वागले. असे प्रकाश आंबेडकर यांची म्हणणे होते. हे मीडिया आणि सांगितले नाही. उलट अँड. प्रकाश आंबेडकरांवर त्यांची जिभ घसरली असा कांगावा केला. अँड. प्रकाश आंबेडकर यांची जिभ घसरलेली नाही.
जिभ घसरणे म्हणजे काय? : जेव्हा एखादी व्यक्ती तिला जे सांगायचे असते ते सांगत असताना चुकून दुसरच काहीतरी बोलते. आपण त्याला त्या व्यक्तीची जिभ घसरली असे साधारणपणे म्हणतो. प्रकाश आंबेडकर यांची जिभ कधी ही घसरत नाही. ते वकील आहेत. अभ्यासू व विद्वान नेते आहेत. ते बोलत असताना विचारपूर्वक व ठामपणे बोलतात. सदर प्रकरणातही ते हे विचारपूर्वक व ठामपणे बोललेले आहेत. सत्य कथन केले आहे. सर्वसामान्य लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेत ते बोललेले आहेत. आम्ही प्राध्यापक मंडळी सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवत असताना अशी उदाहरणे घेऊन समजून सांगत असतो. प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा तेच केलेले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणावर कडाडून टीका केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था ज्याच्यावर ठामपणे उभी आहे अशा सार्वजनिक उपक्रमाची व उद्योगांचीची विक्री सुरू केली आहे. काय हे सत्य नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे, एअर इंडिया, रेल्वे व रेल्वे स्थानके, विमानतळ, बीएसएनएल, हिंदुस्तान पेट्रोलियम, विक्रीला काढले आहे. एलआयसी विकण्याच्या तयारीत आहे. हे सर्व सरकारी उद्योग सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी स्थापन झालेले आहे. नफा मिळविणे त्यांचा हेतू नसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सार्वजनिक उपक्रमांना महत्वाचे स्थान दिलेले होते. हे उद्योग खाजगी भांडवलदारांना उदाहरणार्थ आदानी, अंबानी टाटा, यांना विकत आहे. त्यांच्यासाठी शेती क्षेत्र खुले करण्याच्या हेतूने किमान आधार किंमत म्हणजे एमएसपीची अट रद्द करणारे कृषी कायदे मंजूर केले आहे. बीजेपी व आरएसएस चे आर्थिक धोरण सामान्य जनतेच्या विरोधात आहे. गरीबी, बेरोजगारी, महागाई प्रचंड वाढली आहे. अर्थव्यवस्था संपूर्णपणे कोलमडलेली आहे. याची चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाही.
मीडिया उच्चजातीय भांडवलदारांचा आहे : त्यामुळे त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालविणारे प्रकाश आंबेडकर यांचे विचार पटत नाही. हाच कळीचा मुद्दा आहे. खरेतर अँड. प्रकाश आंबेडकर हे सत्य बोललेले आहेत. त्यांची जिभ घसरलेली नाही. घसरत नाही. घसरणार नाही. ज्या चॅनलनी अशी बातमी दिली ते बीजेपी व आरएसएसचे समर्थक आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची या विषयावर सविस्तर मुलाखत घ्यावी.
Balasaheb's tongue did not slip, does not slip and will not slip; If there is courage, the upper caste capitalists should have an open discussion - Principal M. N. Kamble
संजय काकडे यांचा खोडसाळपणा : दुसरे असे की, बीजेपीचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी याच मुद्द्यावर अँड. प्रकाश आंबेडकर यांना टारगेट करण्याचा प्रयत्न केला आहे. संजय काकडे असे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दारुड्या असे म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी घटनेचा अपमान केला. हे प्रकाशजी म्हणू शकतात आंबेडकर असे म्हणू शकत नाही. म्हणजे आंबेडकर यांचे विषयी आदर दाखवायचा आणि प्रकाशजी ना ठोकायचे. संजय काकडे यांचा हा खोडसाळपणा व बालिशपणा निषेधार्ह आहे. खा. संजय काकडे यांना आंबेडकर घराण्याचा अभ्यास नाही. हा विषय तुमचा नाही. तुम्ही ज्या सनातनी आरएसएस व बीजेपीचे समर्थक आहात. त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरां विषयी काय मते आहे हे आम्ही चांगलेच जाणतो. तुम्हाला घटनेची किती चाड आहे हे आम्हाला चांगले माहिती आहे. तूर्त संजय काकडे एवढेच सांगतोय की डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर हे तुम्हाला शत्रु वाटतात हे हे आम्ही ओळखून आहोत.
खा. संजय काकडे यांनी दुसरा आरोप असा केला की, रामदास आठवले खासदार व मंत्री झाले. मायावती मुख्यमंत्री झाल्या. कारण हे दोघे आंबेडकरी विचारांचे आहेत. प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरी विचारांचे नाहीत म्हणून ते राजकारणात अयशस्वी होतात. हा संजय काकडे यांचा जावईशोध आहे. विस्तार भया मुळे येथे जास्त लिहिता येत नाही. परंतु संजय काकडे आपण हे नीट समजून घ्या की, प्रकाश आंबेडकर हे सत्तेसाठी लाचारी स्वीकारणारे नेते नाही. ज्यांची प्रस्थापित व्यवस्थेला सतत भीती वाटते त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते वैचारिक वारसदार आहेत. तुम्ही नको त्या विषयाला हात घालू नका. ते तुमच्या कुवती बाहेरचे आहे.
Balasaheb's tongue did not slip, does not slip and will not slip; If there is courage, the upper caste capitalists should have an open discussion - Principal M. N. Kamble
प्राचार्य म. ना. कांबळे
पुणे
संपर्क - ९८२२१०१०१६
( प्राचार्य म. ना. कांबळे हे फुले-आंबेडकर विद्वत सभेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. )



0 टिप्पण्या