Ashish Shelar's statement is unconstitutional; Criticism of Panther Deepak Kedar
Social24Network
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर मराठा समाजाची स्त्री असावी असे वक्तव्य भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केले होते. होते. त्याचा चांगलाच समाचार आँल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी घेतला आहे. केदार म्हणाले आहेत की, शेलारांनी केलेले वक्तव्य हे संविधान विरोधी आहे, लोकशाही विरोधी आहे. कारण लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री कोणाला करायचे हे जनता ठरवते. त्यामुळे जातीचं खुळखुळं वाजवणं शेलारांनी बंद करावे असा टोला पॅंथर दीपक केदार यांनी लगावला आहे.
सोशल 24 नेटवर्कशी बोलतांना दीपक केदार म्हणाले आहेत की, आशिष शेलार यांनी काल वादग्रस्त वक्तव्य केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मराठा समाजातील महिलेकडे गेले पाहिजे. या वक्तव्याचा आँल इंडिया पॅंथर सेना जाहिर निषेध करते. निवडणुक आणि लोकशाही ही जातीच्या आधारावर नसते हे शेलारांनी लक्षात घ्यावे. आशिष शेलार या वक्तव्याच्या माध्यमातून कुणाला खुश करीत होते हे समग्र महाराष्ट्राला कळाले आहे. म्हणून मराठा समाजाचीच महिला मुख्यमंत्री पाहिजे हे वक्तव्य लोकशाही विरोधी आहे. संविधान विरोधी आहे. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी पुण्यामध्ये एका महिला कार्यकत्र्याचा मतदार संघ हिसकावून घेतला याबाबत शेलारांनी पक्षाची भूमिका मांडावी. राज्यघटना ही जातीवर आधारित नाही. जनता ठरते कोण मुख्यमंत्री होणार आहे. जातीचं खुळखुळं वाजविणे आशिष शेलारांनी बंद करावे अशी घाणाघाती टीका आँल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे.
0 टिप्पण्या