Support the "Vanchit Bahujan Aghadi" to save education; Principal M. N. Kamble's appeal to employees across the state
Social24Network
शिक्षण क्षेत्राचे काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाने वाटोळे केले आहे. प्रस्तापित पक्षांनी घराणेशाहीचे राजकारण चालविल्यामुळे वंचित बहुजन समूहाला प्रतिनिधीत्व मिळाले नाही. पुढा-यांच्या या राजकारणात विद्यार्थी, शिक्षक, पदवीधर, प्राध्यापक भरडल्या जात आहेत. हे थांबविण्यासाठी, शिक्षण क्षेत्र व शिक्षण क्षेत्रातील आरक्षण वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला साथ द्या, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष तथा फुले आंबेडकर विद्वत सभेचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य म. ना. कांबळे यांनी केले आहे.
यासंदर्भात प्राचार्य कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, फुले आंबेडकर विद्वत सभा आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी हितकारणी संघटना, पुणे या विविध संघटनांच्या वतीने जाहीर पाठिंबा करणारे पत्रक प्रसिद्ध केले असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 1 डिसेंबर 2020 रोजी होणा-या पदवीधर मतदार संघ व शिक्षक मतदार संघ निवडणुकीत ‘‘वंचित बहुजन आघाडी’’चे अधिकृत उमेदवार आणि पुरस्कृत उमेदवार यांना या निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी हितकारणी संघटना, पुणे व फुले आंबेडकर विद्वत सभेचा जाहीर पाठिंबा देत आहोत.
वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागाचे उमेदवार प्रा. नागोराव पांचाळ, नागपूर विभागाचे उमेदवार इंजि. राहुल वानखेडे, पुणे विभागाचे उमेदवार प्रा. सोमनाथ साळुंखे, पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे पुरस्कृत उमेदवार सम्राट शिंदे, अमरावती विभाग शिक्षण मतदार संघाचे पुरस्कृत उमेदवार महेश डवरे आदींना जाहीर पाठिंबा देत असल्याचे प्राचार्य कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील तीनही संघटनांच्या जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सभासदांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांच्या पाठिशी उभे राहावे असे आवाहन प्राचार्य कांबळे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या