भाजप/आरएसएस प्रणित जातीयवादी व्यवस्था उलथुन टाकण्यासाठी सज्ज व्हा... - दीपक केदार

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भाजप/आरएसएस प्रणित जातीयवादी व्यवस्था उलथुन टाकण्यासाठी सज्ज व्हा... - दीपक केदार



Social24Network

भारतीय जनता पक्षाचे सरकार स्वतःला इंग्रज समजायला लागले आहेत. आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. परंतु सरकार आंदोलनकर्त्यांना आपल्या सोईनुसार नक्षलवादी, आतंकदवादी, खलिस्तानी घोषित करून या देशामध्ये हुकुमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. या भयावह परिस्थितीमध्ये मोदी-शहांना पळवुन लावण्याची ताकद फक्त वंचित बहुजन समाजात आहे. या देशातील वंचित घटक, दलित, ओबीसी, आदिवासी, बहुजन, शेतकरी, कामगार एकत्र येवुन या हुकुमशाही सरकारविरूद्ध बंड करेल त्या दिवशी ही जातीयवादी व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पॅंथर दीपक केदार यांनी केले आहे. 


दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी केदार म्हणाले की, शेतकरी आंदोलकांना खलिस्तानी म्हणणारेच आतंकवादी आहेत. शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणाऱ्यांनी उत्तर द्यावं, आरएसएसच्या सत्तेत बसलेली साध्वी प्रज्ञा कोण आहे? अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा कोण आहे? पुलवामा हल्ला 2 दिवस आधी माहीत असणारा आतंकी अर्णब गोस्वामी कोण आहे? भारतीय नागरिकांना लाल किल्ह्या खूला आहे. लाल किल्ल्यावर गेल्याने आतंकवादी होत नाही सत्तेत बसलेले स्वतःला इंग्रज समजायला लागलेत, हिटलर समजायला लागलेत. झेंडा फडकवणारा भाजपचा दंगलखोर आहे. ज्यानी दिल्ली दंगल घडवली त्या अनुराग ठाकूर आणि कपिल मिश्राच्या आतंकी गँगने शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसून हिंसाचार घडवला आहे. 


मुख्य मुद्यावरून आंदोलन वळवणे ही भाजपची स्टाईल आहे. भीमाकोरेगाव आंदोलनाला नक्षलवादी घोषित केलं, रोहित वेमुलाच्या आंदोलनाला नक्षलवादी घोषित केलं, आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नक्षलवादी घोषित केलं ही भाजपची नौटंकी आहे. शेतकरी बिल यावरून लक्ष हटवून ते हिंसाचार या मुद्यावर आणलं. मोदी-शहांना देश सोडून पळून जावं लागेल एवढी अफाट ताकद शेतकरी, बहुजन, आदिवासी, कामगार यांची आहे ज्यादिवशी एकत्र येऊन चाल करतील तेव्हा या दोघांना पळून लावल्याशिवाय राहणार नाहीत.


हिंसा ही भाजपाची देणं आहे. शेतक-यांचे आंदोलन गेल्या 56 दिवसांपासुन सुरू आहे, शेतक-यांचा सरकार किती दिवस अंत पाहणार आहे. शेकडो शेतकरी या आंदोलनामध्ये शहिद झाले आहेत, त्याचा उद्रेक तर होणारच. सरकार जनतेच्या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. म्हणुन येत्या काळात ऑल इंडिया पॅंथर सेना दलित अत्याचार, संभाजी भिडेला अटक, भुमिहिन मजुर, गायरान हक्क, स्वाधार योजना, घरकुल निधी, अॅट्रोसिटी अॅक्ट पीडितांचा निधी इत्यादी प्रश्नांवर व्यापक जनआंदोलन उभे करणार आहे. प्रत्येक वंचित घटकाने या जनआंदोलनामध्ये शामिल होवुन या देशाच्या विकासासाठी आपले योगदान द्यावे, मी जेव्हा आवाज देईल तेव्हा लाखोंच्या संख्येने माझ्या सोबत या! असे आवाहन ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या