शरद पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणावर आपलं मत व्यक्त करतांना हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगितले आहे. शरद पवारांना त्यांची इज्जत राखायची असेल तर त्यांच्याकडे धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्यापलिकडे दुसरा पर्याय नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. काल (दि. 14 जानेवारी रोजी) पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी निवडणुक आयोगाकडे सादर केलेल्या अॅफिडेव्हिटमध्ये चुकीची माहिती दिली असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. याची तक्रार निवडणुक आयोगाकडे करून काही साध्य होणार नाही कारण चुकीची माहिती सदर करणे ही बाब क्रिमिनल कोर्टाच्या अंतर्गत आहे. याप्रकरणी आंबेडकर म्हणाले की, राजकारणी माणुस अज्ञानी आहे अशी अवस्था नसते. तर तो ज्ञानी असतो. परंतु काही साधायचे असेल तर तो अज्ञानाचे सोंग घेतो. त्यामुळे ज्यांनी अज्ञान दाखविले आहे त्यांनी सोंग का केली याचा खुलासा करावा.
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन प्रकरणी बोलतांना अॅड. आंबेडकर म्हणाले की, दिल्लीमध्ये एनआरसी आणि सीएनए च्या विरोधात शाहीन बाग मध्ये जे आंदोलन सुरू होते. केंद्र सरकार ते आंदोलन हुसकवण्याच्या मार्गावर होते. विविध राजकीय पक्षांचा या आंदोलनाला शाब्दिक पाठिंबा होता. प्रत्यक्षात आंदोलनामध्ये त्या-त्या राजकीय पक्षाचे नेते उतरले नसल्यामुळे शासनाला हे आंदोलन हुसकवणे सहज सोपे होते. अशा वातावरणात पंजाबचा शेतकरी दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धावुन आला. या पाश्र्वभुमिवर वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम कार्यकत्र्यांना असे वाटत होते की, मुस्लिम समाजातील धार्मिक नेते आलिम, मौलवी, मुफ्फी या सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि कृतिशिल कार्यक्रम जाहिर करावा. परंतु धार्मिक नेत्यांनी कोणताही कार्यक्रम जाहिर केला नाही. तेव्हा महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम कार्यकत्र्यांनी बैठक घेतली. आणि एक निर्णय घेतला की, 27 जानेवारीला संपुर्ण महाराष्ट्रामधिल प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणुन आणि एनआरसी, सीएए च्या विरोधात आंदोलन होणार आहे.
27 जानेवारीला राज्यभरात आंदोलन
दि. 27 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रभर जिल्हा, तहसिलवर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन होणार आहे. देशामध्ये चाललेल्या धार्मिक राजकारणाच्या बाहेर येवुन लोकांच्या प्रश्नावरचं आंदोलन झालं पाहिजे. ही मुख्य भुमिका या आंदोलनाची असणार आहे. महाराष्ट्रामध्ये सेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी कृतिशील पाठिंबा अजुनही आलेला नाही. त्यामुळे त्यांनी कृतिशील पाठिंबा जाहिर करावा, अशी मागणी अॅड. प्रकाश आंबेडकर आंबेडकरांनी यावेळी केली आहे.


0 टिप्पण्या