Social24Network
बुद्ध लेण्यांवर दिवसेंदिवस हिंदु देवी देवतांचे अतिक्रमण वाढत चालले असुन त्याला खतपाणी घालण्याचे काम खा. अमोल कोल्हे करीत आहेत. खा. अमोल कोल्हेंच्या या भुमिकेतुन राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा धार्मिक दहशतवाद समोर आला आहे, तात्काळ बुद्ध लेण्यांवरील अतिक्रमण हटविले नाही तर ‘जयभीम’च्या घोषणा देत लेण्यांवरील अतिक्रमण हटविले जाईल असा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघातील लेण्याद्री येथील गिरीजात्मक अष्टविनायक मंदिर हे बुद्ध लेणीवर केलेले अतिक्रमण आहे. तेथे दररोज भाविक भक्त दर्शनासाठी येतात त्यांच्याकडुन पुरातत्व विभाग शुल्क आकारत असल्यामुळे सदरील शुल्क माफ करण्यात यावे आणि त्या ठिकाणी असलेले तिकीटघर लेण्यांच्या परिसरात स्थलांतरीत करण्यात यावे अशी मागणी खा. अमोल कोल्हेंनी केली होती. त्यावर दीपक केदार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत खा. कोल्हेंवर अतिक्रमणाचे समर्थन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान खा. अमोल कोल्हेंनी दिल्ली येथील आर्केलाॅजीकल सर्वे ऑफ इंडियाच्या महासंचालकांना एका निवेदनाद्वारे विनंती केली होती की, गणपतीचे दर्शन घेणा-या भक्तांकडुन शुल्क आकारण्यात येवु नये. याप्रकरणी आॅल इंडिया पॅंथर सेना आक्रमक झाली असुन पुरातत्व विभागाने हिंदुत्ववादी देवी देवतांचे संपुर्ण देशामधील लेण्यांवर असलेले अतिक्रमण तात्काळ हटवावे अन्यथा 'जयभीम'च्या घोषणा देत लेण्यांवरील अतिक्रमण हटविण्यात येईल असा इशारा केदार यांनी दिला आहे.
सोशल 24 नेटवर्कशी बोलतांना केदार म्हणाले की, लेण्यांद्री बुद्ध लेणीवर काल्पनिक गिरिजात्मक अष्टविनायक गणपती मंदिर हे अतिक्रमण आहे. लोकप्रतिनिधी असलेल्या संवैधानिक पदावर बसलेल्या खा. अमोल कोल्हे जातीय आणि धार्मिक मानसिकतेतून अतिक्रमण कायम करण्यासाठीची भूमिका घेणे हे अपराधिक कृत्य आहे. पुरातत्व विभागाचं तिकीटघर हे तिथेच राहणार कारण जेवढा भाग बुद्ध लेणीचा आहे त्याला अनुसरून तिथे तिकीटघर उभा केलं आहे. धार्मिक दहशतवादी प्रवृत्तीने हा खोडसाळपणा करून लेणीवर अतिक्रमण केले आहे. स्वतःची दुकानदारी बसवण्यासाठी, राजकीय पोळी भाजण्यासाठी, बुद्ध लेण्यांचं ऐतिहासिक अस्तित्व संपवण्यासाठी जाणीवपूर्वक मनुवादी धर्ममार्तंडांनी लेण्यांद्री बुद्ध लेणीवर अतिक्रमण केले आहे. ऐकेकाळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील याने सुद्धा लेणी संपवण्याचा खेळ केला. आता खासदार अमोल कोल्हे यांनी पुरातन विभागाला पत्र देऊन तिकीटघर हलवून लेलेणीवरील मंदिर अतिक्रमणाचे समर्थन केले आहे. याचा आम्ही निषेध करतो.
0 टिप्पण्या