अकोला/प्रतिनिधी:- ओबीसी समूहाची मोट बांधुन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे हात अकोला जिल्ह्यामध्ये मजबूत करणारे ओबीसी नेते ॲड. संतोष रहाटे वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचे त्यांनी जाहिर केले होते, परंतु पक्ष-कार्यकत्र्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यांना सदिच्छा व्यक्त केल्या.
ॲड. संतोष रहाटे यांच्या वाढदिवसानिमित्त काल (दि. 9 मार्च 2021) रोजी अकोला येथील सूर्याेदय अनाथ आश्रमात फळं व बिस्किटे वाटप करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ अकोला जिल्हाध्यक्ष शुभम डहाके, येलगर सेना युवाध्यक्ष नीरज रहाटे, मयूर कावडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्यात आले.
0 टिप्पण्या