मानवी जीवनात पूर्णता प्राप्त करणे म्हणजे धम्म ! - भन्ते अश्वजित

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मानवी जीवनात पूर्णता प्राप्त करणे म्हणजे धम्म ! - भन्ते अश्वजित

 

फोटो सौजन्य गुगल

या पृथ्वीतलावर असणाऱ्या सर्व मानवजातीला आपले कल्याण साधायचे असेल, तर प्रत्येक मानवाने तथागतांनी सांगितलेला धम्म अंगिकारुन स्वत:चे जीवन सफल करावे, पूर्ण करावे. मग तो माणूस कोणत्याही वर्णाचा असो वा कोणत्याही देशाचा असो! तथागतांनी मानवी जीवनात पूर्णता प्राप्त करणे संदर्भात मानवाला जो धम्म सांगितला तो पुढील सहा प्रकरणातून विषद केला आहे.


१) जीवनाला पवित्र ठेवणे : जीवनाला पवित्र ठेवणे म्हणजे जीवहिंसा करणे, चोरी करणे आणि मिथ्याचारापासून स्वतःला विरक्त ठेवणे. म्हणजेच शारीरिक पावित्र्य राखणे. तो खोटे बोलण्यापासून विरक्त झाला तर त्यास त्याची मानसिक पवित्रता समजावी. अशा प्रकारे जो शरीर, वाणी आणि मन यांनी पवित्र झालेला असेल त्यालाच लोक निष्कलंक म्हणतात, पवित्र म्हणतात. 


२) जीवनात पूर्णता प्राप्त करणे - शरीराची, वाणीची आणि मनाची पूर्णता प्राप्त करणे म्हणजेच संपूर्ण जीवनात पूर्णता प्राप्त करणे होय. चित्तमलाचा पूर्णपणे क्षय करून वित्त-विमुक्तीचा अनुभव करणे, यालाच मनाची पूर्णता म्हणतात. तथागतांनी सुभूतीला उपदेश करताना सांगितले, चित्ताच्या सर्व अवस्थांना लक्षात ठेवून कोणत्याही प्रकारची आसक्ती न ठेवता बोधिसत्व दान देतो. हीच बोधिसत्वाची 'दानपारमिता' होय. तो स्वत: दहा कुशल मार्गांचा अवलंब करीत विचरण करतो आणि दुसऱ्यांनाही तसेच करण्याची प्रेरणा देतो. हीच त्याची 'शील पारमिता' होय तो स्वतः क्षमाशील होऊन दुसऱ्यांनाही क्षमाशील राहण्याची प्रेरणा देतो, ती त्याची 'शांती पारमिता' होय. तो सतत पाच पारमितांची पूर्ती करण्यातच मग्न असतो व दुसऱ्यांनाही तसाच उपदेश करतो, ही त्याची 'वीर्य पारमिता' होय. तो कौशल्याने समाधीचा लाभ घेतो व पुन्हा जन्म घेत नाही. ही त्याची 'समाधी पारमिता' होय तो भौतिक व अभौतिक वस्तूमध्ये न गुरफुटता स्वभाव धर्माविषयी विचार करतो व तसे करण्याची दुसऱ्यांनाही प्रेरणा देतो, ही त्याची 'प्रज्ञा पारमिता' होय. ह्या सर्व पारमितांचा विकास करणे म्हणजेच 'धम्म' होय.


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


३) निर्वाण प्राप्त करणे - तथागतांनी म्हटले आहे की, 'निर्वाणापेक्षा अधिक सुखद काहीच नाही त्यांच्या उपदेशात निर्वाणाला प्रमुख स्थान आहे. निर्वाणाचा अर्थ म्हणजे आपल्या प्रवृत्तीवर एवढा ताबा ठेवणे, जेणेकरून मनुष्य पूर्णतः धम्माच्या मार्गावर चालू शकेल. याशिवाय अधिक याचा अर्थ नाही. निर्वाणाचा मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग. शब्दाच्या व्युत्पत्तीच्या दृष्टीने 'निर्वाण' शब्दाचा अर्थ 'विझणे' असा आहेच; परंतु हे रागाग्नी, मोहाग्नी व द्वेषाग्नीचे विझणे होय. सर्व प्रकारच्या प्रवृत्तीचे नष्ट होणे नव्हे. निष्कलंकतेचा मार्ग म्हणजेच निर्वाणाचा मार्ग याप्रमाणे निर्वाण व परिनिर्वाण यात मोठा फरक आहे. परिनिर्वाण म्हणजे शरीर, मन, चेतना यांची सर्व प्रकारची प्रक्रिया बंद होणे, म्हणजे पूर्णपणे विझून जाणे, अर्थात मनुष्याचा अंत होणे.

भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

४) तृष्णेचा त्याग करणे - 'आरोग्य सर्वात मोठा लाभ असून संतोष सर्वात मोठे धन आहे' असे तथागतांनी धम्मपदात म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्याचा अभिप्राय हाच होता की, मनुष्याने लोभाच्या आहारी जाऊ नये. लोभाला ताब्यात ठेवले पाहिजे. लोभाच्या इच्छेतूनच तृष्णेचा जन्म होतो व त्यामुळे लोभ वाढत जातो. तृष्णा व लोभ यांच्यामुळेच पुष्कळशी वाईट कर्मे मनुष्याच्या हातून घडतात. तृष्णा कधीच नष्ट न होणारी आहे. यास्तव संतोष सर्वात मोठे धन असून तृष्णा व लोभ यांना वशीभूत केल्याने ते प्राप्त होते यालाच तथागतांनी धम्म म्हटले आहे.


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


५) सर्व संस्कार अनित्य आहेत असे मानणे:-अनित्यतेच्या सिद्धांताचे तीन भाग पडतात. १) अनेक तत्त्वांच्या मिश्रणाने बनलेल्या सर्वच वस्तू अनित्य आहेत. २) व्यक्तिशः प्राणी अनित्य आहे. ३) प्रतीत्य-समुत्पन्न वस्तूंचे 'आत्मतत्व' अनित्य आहे. प्रत्येक वस्तू हेतू व प्रत्ययापासून उत्पन्न होते. कोणत्याही वस्तुला स्वतंत्र अस्तित्व नाही. हेतू प्रत्ययांचा उच्छेद झाल्यावर वस्तूंचे अस्तित्व नष्ट होते. पृथ्वी, जल, अग्नी व वायू या चार महाभूतांपासून पृथक्करण झाले की, प्राणी नष्ट होतो. याचा सारांश असा की, मानव निरंतर परिवर्तनशील आहे. निरंतर संवर्धनशील आहे. तो आपल्या जीवनाच्या दोन भिन्न क्षणातही एकच नसतो. सर्व वस्तू अनित्य असून परिवर्तनशील आहेत. असे नसते तर जीवनाचा विकासच थांबला असता. मानवजातीची प्रगती सर्वथा थांबली असती यास्तव कोणत्याही वस्तूविषयी आसक्ती ठेऊ नये, हीच शिकवण मिळते. संपत्ती, नातलग, मित्रमंडळी आणि परिचीत लोक यांच्याविषयी अनासक्ती बाळगा. कारण सर्व वस्तू अनित्य आहेत. असा तथागत बुद्धाचा उपदेश आहे. 


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


६) 'कर्माला' मानव जीवनाच्या नैतिक क्रमाचा आधार मानणे:- विश्वाच्या नैतिक क्रमाना बनविणारा कोणी ईश्वर नाही. कर्म नियमानुसार विश्वाचा नैतिक क्रम बनलेला आहे. तथागतांच्या उपदेशानुसार विश्वाचा नैतिक क्रम वाईट असो तो सर्वथा मनुष्यावर अवलंबून आहे. नैतिक क्रम चांगला असो व वाईट असल्यास मनुष्य अकुशल कर्म करतो. नैतिक क्रम चांगला असल्यास मनुष्य कुशल कर्म करतो. आणि ज्या प्रमाणे रात्र दिवसाचा पाठलाग करते. त्याचप्रमाणे मनुष्याच्या कर्माचा परिणाम (कर्मविपाक) त्याचा पाठलाग करीत असतो. यालाच कर्माचा नियम म्हटलेले आहे. कुशल कर्माने प्रत्येकाचा लाभ होतो व अकुशल कर्माने प्रत्येकाची हानी होते. कर्म व त्याचा विपाक यांच्यात काळाचे कमी अधिक अंतर होऊ शकणे शक्य आहे. यास्तव तथागत बुद्धांचा उपदेश आहे की, सदासर्वदा कुशल कर्म करावे म्हणजे नैतिक क्रम चांगला होऊन मानवतेचा लाभ होईल. या दृष्टीने पाहता कर्माचे प्रकार येणेप्रमाणे 


१) दिद्वधम्मवेदनीय कर्म:- या जन्मात फळ देणारे कर्म. 

२)उपज्जवेदनीय कर्म:- उत्पन्न झाल्यानंतर फळ देणारे कर्म. 

३) अपशपरियवेदनिय कर्म:- अनिश्चित काळी फळ देणारे कर्म. 

४) अहोसि कर्म:- फळ न देणारे अति दुर्बल कर्म.


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

व्यक्ती जगात येतात आणि जातात, परंतु विश्वाचा नैतिक क्रम टिकून राहतो. (शाश्वत राहतो) आणि त्याच्याबरोबर कर्म नियमसुद्धा टिकून राहतो. याच कारणामुळे अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान आहे. तेच तथागत बुद्धाच्या धम्मात नैतिकतेला आहे. 'विश्वाचा नैतिक क्रम' टिकून ठेवणे सर्वथा 'कर्म नियमाच्या सिद्धांतावर अवलंबून आहे. यामुळेच 'कर्मचा नियम' धम्माचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे.


              


भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार,

आरती नगर, औरंगाबाद

मो.नं. ९६७३२९२२९७


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या