आंबेडकरी राजकीय विश्लेषक प्रा. भारत सिरसाट यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने प्रसिद्ध कवी तथा प्रकाशक प्रा. देवानंद पवार यांचा लेख...
महमानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेले व्यक्तिमत्व म्हणजे प्रा.भारत शिरसाठ होय. विचाराला आचाराची जोड देऊन आंबेडकरी चळवळीत विद्यार्थी दशेपासून ते आज पर्यंत सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखले जाते. महामानवाचे विचारच आपल्या समाजाला जिवंत ठेऊ शकतात या ऊद्देशाने त्यांनी रमाई चळवळीच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीतील पहिल्या पिढीतिल विचारवंत, कवी , लेखक , साहित्यिक यांना भीम जयंती, रमाई जयंती , सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर जयंती तसेच महापरिनिर्वाणदिन, स्री मुक्ती दिनाचे औचित्य साधून विचारवंतांचे विचार समाजाला एकण्यास भाग पाडले आणि हळू हळू माणसे जुळत गेली या मधूनच त्यांनी आंबेडकरी चळवळीतील महिलांना लिहते आणि बोलते करण्यासाठी प्रा.डॉ.रेखा मेश्राम मॅडम यांच्या पुढाकाराने रमाई मासिक , रमाई फाऊंडेशन आणि रमाई चळवळीचे साहित्य संमेलन घेऊन आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याचे कार्य त्यांनी केले या मधून त्यांची आंबेडकरी निष्ठा आपल्याला दिसून येते.
नामांतराची झळ त्यांच्या पर्यंत येत असताना त्यांनी आंबेडकरी चळवळीत विद्यार्थी जीवनातच सक्रिय होऊन व्यवस्थेला परिवर्तनाची दिक्षा देण्याला सज्ज झाले विद्यार्थी जीवनात अनेक आंदोलन केले, मोर्चात सहभाग नोंदविला. मुळात नागसेनवनात त्यांची जडणघडण झाल्यामुळे ते समता,न्याय ,स्वतंत्र आणि बंधूभाव च्या मार्गाने मार्गक्रमण करायला लागले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयाने विचारवंत, कवी, साहित्यिक, लेखक, कार्यकर्ते घडविले याच नागसेनवनातील प्रा. भारत शिरसाठ आहेत. येथील ऊर्जा आज ही समाजाला लढण्याचं , जगण्याचं बळ देते म्हणून आंबेडकरी चळवळीच्या हृदयावर नागसेनवनाचं नाव गोंदलेले आहे.
प्रा.भारत शिरसाठ सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले असून घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही त्यांनी तीचे भांडवल केले नाही त्यांचे वडिल बालपनातच त्यांना सोडून गेले आई चे छत्र असल्याहून नसल्या सारखेच होते याला कारण गरिबी पण या प्रसंगाना ते चिटकून राहिले नाही पुढील शिक्षण घेत आता आंबेडकरी चळवळच आपले गणगोत मानून शिरसाठ सर चळवळीत लिलया होत गेले. त्यांनी एम.ए.पाली अँड बुद्धीझम, एम.ए. फुले-आंबेडकर विचारधारा, एम.ए.एम.सी.जे.पत्रकारीता, नाट्यशास्र पदविका, असुन पाली अँड बुद्धीझम मध्ये नेट आहेत तसेच धम्मक्रांती आणि भारतीय बौद्ध महासभा या विषयावर त्यांचे संशोधन सुरु आहे.त्यांची शैक्षणिक पात्रता लक्षात घेता त्यांचा आणि आंबेडकरी चळवळीचा ते एक भाग बनले आहेत.
याच बरोबर त्यांनी काही पुस्तकांचे लेखन आणि संपादन केल्याचे आपल्याला दिसून येते तसे पहिल्यास आपल्या मराठवाडा मध्ये संपादनाचे कार्य फार महत्वाचे असून ती एक आपली परंपरा आहे यात प्रा. भारत शिरसाठ दिसून येतात. त्यांची प्रकाशीत पुस्तके खालील प्रमाणे आहेत.
□ पाली साहित्याचा संक्षिप्त इतिहास - लेखन
□ माध्यमांचा सांस्कृतिक दहशतवाद - संपादन
□ भय्यासाहेब आंबेडकर एक वादविवाद - संपादन
□ समर्पिता: प्रा.सुशिला मुल जाधव गौरव ग्रंथ - मुख्य संपादक
□ संघर्ष: स.सो.खंडाळकर गौरव ग्रंथ - मुख्य संपादक
□ डोळस : प्रा.अविनाश डोळस गौरव ग्रंथ - संपादक मंडळ सदस्य
ही त्यांची ग्रंथ संपदा असून ते एक चळवळी चे प्रकाशक आहेत. त्यांनी रमाई प्रकाशनाच्या माध्यमातून अनेक पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. तसेच त्यांनी फुले आंबेडकरी विद्वत सभा औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्षपद भुषविले आहे. या मुळे त्यांच्या कार्याची दखल म्हणून त्यांना शिक्षक गौरव पुरस्कार 2016- 17 ला मिळालेला आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद च्या ताराबाई शिंदे स्री अभ्यास केंद्राचा- स्री-पुरुष समता गौरव पुरस्कार 2017 ला मिळालेला आहे. अश्या अनेक पुरस्काराने ते प्राप्त असून त्यांनी विविध वृत्तपत्र, अनीयतकालीक , आकाशवाणी मधून त्यांनी प्रबोधन केलेले आहे .
रमाई फाऊंडेशन, रमाई मासिक, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर प्रतिष्टान आणि चळवळीचे रमाई साहित्य संमेलना चे ते मार्गदर्शक आहेत. आंबेडकरी चळवळीत काम करित असताना त्यांच्या अनेक अनुभवातून त्यांनी त्यांच्या पत्नी डॉ.रेखा मेश्राम मॅडम यांच्या माध्यमातून आंबेडकरी महिलांची स्वतंत्र चळवळ सुरु केली याचा प्रचंड अभिमान समाजमनात नक्कीच आहे आणि राहिल. प्रा.भारत शिरसाठ हे चळवळी चे अभ्यासक असून बौद्ध धम्मातील आचार विचार आणि संस्कृतीला जुळवून ठेवण्यासाठी त्यांनी विविध भागातील विविध जिल्ह्यातील सर्व भीम अनुयायांमध्ये जिव्हाळ्याचे वातवरण निर्माण केलेले आहे.जाती पोटजातीला हद्दपार करण्यासाठी वेग वेगळे आप आपल्यातील विवाह संबंध त्यांनी जुळवून आणले यामधून त्यांची सशक्त आणि मजबूत आंबेडकरी चळवळ दिसून येते . मुळात प्रा.भारत शिरसाठ सर आंबेडकरवादी असल्याने राजगृहा शी त्यांचा जिव्हाळा आहे. याच मुळे त्यांनी सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान ची औरंगाबाद ला प्रा.अविनाश डोळस , राजा ढाले, ज.वी.पवार , रणजीत मेश्राम , सुशिला मुल जाधव, अरुणा लोखंडे, प्रा.संजय मुन यांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी स्थापन करुन भय्यासाहेब आंबेडकर यांचे विचार समाज मनात पेरण्याला सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे औरंगाबाद मध्ये भय्यासाहेब आंबेडकर यांची सार्वजनीक जयंती साजरी करुन भव्य मोटरसायकल रॅली त्यांनी काढलेली होती. म्हणूनच सामजिक ,साहित्यिक ,सांस्कृतिक, राजकीय आणि धम्म या क्षेत्रातील प्रत्येक वळणावर प्रा.भारत शिरसाठ आपल्याला दिसून येतात. या सर्व कार्यात म्हणतात ना एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठी मागे स्रीयांचा हात असतो याच म्हणी नुसार शिरसाठ सर यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या पत्नी डॉ. रेखा मेश्राम यांचा सिंहाचा वाटा आहे.हे विसरुन चालणार नाही. मी या दोघांचे ही अभिनंदन करतो. हे दोघे ही समतापर्वातील परिवर्तनवादी आंबेडकरी कुटुंब आहे. आज प्रा.भारत शिरसाठ सर यांचा वाढदिवस आहे या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.
जय हो ! मंगल हो !!
□ प्रा.देवानंद पवार
0 टिप्पण्या