बोद्धाचार्य रमेश गोपणारायन लिखित "धम्मदृष्टी" पुस्तकाचे प्रकाशन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बोद्धाचार्य रमेश गोपणारायन लिखित "धम्मदृष्टी" पुस्तकाचे प्रकाशन

 

बुद्धपौर्णिमा निमित्त "धम्मदृष्टी"  पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

अकोला :  येथील खेकडी येथे  बोद्धाचार्य रमेश


गोपणारायन यांनी लिहिलेल्या धम्मदृष्टी या पुस्तकाचे मोठ्या थाटात प्रकाशन करण्यात आले, याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ते उपस्थित होते,   धम्मदृष्टी पुस्तकामध्ये रमेश गोपणारायन यांनी गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मध्यम मार्गाचा उल्लेख करत समाजात वावरतांना सामान्य माणसाचे आचरण कसे असावे? बुद्ध, धम्म, संघ नेमके काय आहे? इत्यादी बाबींवर सखोल व आत्मभूत लिखाण केले आहे.रमेश गोपणारायन बोलतांना म्हणले की,गोपणारायन यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे, त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी साधना  गोपनारायण मोलाचा वाटा आहे. पुस्तक  प्रकाशन सरणम पब्लिकेशन,औरंगाबाद यांच्या माध्यमातून झालेले आहे. कार्यक्रमाला गावचे माजी सरपंच किरण पांडे,  प्रकाश  गोपनारायण, गोकुळ गोपनारायण,  रामदास मोरे, रवींद्र गोपनारायण, श्रीधर गोपनारायण, सिद्धार्थ गोपनारायण, अनिरुद्ध गोपनारायण व  नितीन गोपनारायण, इत्यादी सोबत मान्यवर तसेच महिला मंडळ यांचीही उपस्थिती होती,प्रा. शिलवंत गोपणारायन यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन भाग्यश्री गोपणारायन यांनी केले,तर आभार पूनम गोपणारायन यांनी मानले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शारीरिक अंतर ठेवून व कोरोनाचे  नियम पाळून  कार्यक्रम साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या