औरंगाबाद: मनपा आयुक्त, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता, अभियंता या सर्वांवर कायदेशीर कारवाई करणे बाबत बेगमपुरा पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आलेली आहे न्यू पहाडसिंगपुरा भागात गेल्या अनेक महिन्यांपासून नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत असून यासंदर्भात महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा व महापालिकेचे आयुक्त यांना पण तक्रार करून सुद्धा काही एक
उपयोग होत नाही शेवटी एवढं घाण पाणी पिण्याची आम्ही नागरिकांवर वेळ आल्यामुळे आज रोजी आम्ही बेगमपुरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सचिन सानप साहेब यांना तक्रार देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळेवरच आमच्या पाण्याचा प्रश्न सोडविला नाही तर भविष्यात महापालिकेत आम्ही स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात आंदोलन करू असा इशारा या माध्यमातून देण्यात येत आहे.
0 टिप्पण्या