सांगली || पूरग्रस्तांना ‘वंचित’चा मदतीचा हात

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सांगली || पूरग्रस्तांना ‘वंचित’चा मदतीचा हात



सांगली/प्रतिनिधी - सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यामध्ये पर्जन्यवृष्टीने थैमान घातले असून प्रचंड पावसाने रौद्र रूप धारण करून मानवी जीवन अस्त-व्यस्त केले त्यात पूर आल्यामुळे अनेकांचे संसार व व्‍यापार-व्यवसाय उघड्यावर पडले. दळणवळण व्यवस्था खंडित झाली. अनेक दिवसांपासून विद्युत् पुरवठा बंद असल्यामुळे असुविधेचा सामना करावा लागला. नदीकाठी असलेल्या गावातील घरांना व दुकानांना आठ-दहा फूट पाण्याने वेढले त्यात जीवनावश्यक वस्तू व त्यातील सर्व साहित्य पाण्यात वाहून गेले, घरांची खूप प्रमाणात पडझड झाली, उभ्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शासनाकडून मदतीच्या अपेक्षेने गावकरी आस धरून आहेत अशा बिकट परिस्थितीत व कोरोनाच्या सावटाखाली समाज जीवन अत्यंत हाताश झालेले असताना बहुजन नायक ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी केलेल्या आवाहना प्रमाणे मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी माणुसकीचा मदतीचा हात पुढे केला. 


    
ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगली जिल्ह्यातील दत्तक घेतलेल्या ब्रम्हनाळ सह खटाव, माळवडी, भिलवडी व इतर गावांना प्रत्यक्ष भेट देऊन गावांची पाहणी केली. पीडितांच्या वेदना समजून घेतल्या. मराठवाडा विभागीय महासचिव संतोष सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने राज्याचे नेते भीमराव दळे, प्रशिक्षक डॉ. सुरेश शेळके, युवा नेते अमोल लांडगे, जिल्हाध्यक्ष इंजि. राजेश गायगवाळे यांच्या हस्ते नुकसानग्रस्त गरजूंना ब्लॅंकेट तसेच लहान मुले व पुरुषांसाठी जॅकेट्सचे वाटप करण्यात आले.

    पुरामुळे जे शेतीचे व घरातील साहित्याचे झालेले नुकसान शासन प्रशासनाने भेदभाव न करता त्वरित सरसकट मदत करुन त्यांचे योग्य पुनर्वसन करावे असे भीमराव दळे यांनी आवाहन केले. संतोष सुर्यवंशी यांनी म्हटले की आपल्या संकटाच्या काळात सर्व वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत राहील त्यासाठी वेळप्रसंगी पक्षातर्फे आंदोलन करू व आपले हक्क मिळवून देऊ अशी नुकसानग्रस्त ग्रामस्थांना ग्वाही दिली. शासनाने आवाहन केलेल्या पुनर्वसनासाठी सर्व नागरिक ही तयार आहेत परंतु लातूर व सांगली या ठिकाणचे केलेले पुनर्वसन अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झालेले आहे. असे निकृष्ट दर्जाचे शासनाने केलेले पुनर्वसन वंचित बहुजन आघाडी खपून घेणार नाही असे डॉ. सुरेश शेळके यांनी सूचित केले.

 

    नुकसानग्रस्त नागरिकांचे दुःख दूर करण्यासाठी वंचित आघाडी टीमने प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्रशासनाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. त्यांच्या सोबत चर्चा करण्यात आली व सध्या पंचनामे व तपासणी करण्यात वेळ न घालवता सर्वांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे असे गृहीत धरून शासनास पंचनामे सादर करावेत व नुकसानग्रस्तांना लवकर मदत करावी असे सूचित करण्यात आले.

    यावेळी स्थानिक पदाधिकारी किरण कांबळे, इंजी. प्रशांत कोळी, इंजी. मुरलीधर बनसोडे, नीलेश गवाले, अमित बंसोडे, अरुण थोरात व इतर पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या