बुलढाणा/प्रतिनिधी - शेगाव तालुक्यातील ग्राम कुरखेड येथे वर्षावासानिमित्त "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाचे पठनाला आजपासून (दि. 24 जुलै) सुरूवात करण्यात आली आहे. आर्याजी धम्मसुधा नागपुर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथाचे पठण करण्यात येणार आहे.
बौद्ध धम्म नियमानुसार प्रत्येक वर्षातील आषाढी पोर्णिमा ते अश्विन पोर्णिमा या कालावधीमध्ये (वर्षावास) ग्रंथ पठन करण्यात येत असते. त्यानुसार ग्राम कुरखेड येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ग्रंथपठणाला सुरूवात झाली आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी दिलीप वाकोडे, किशोर दाभाडे, भाउराव अवचार, जानराव सिरसाट, नानाभाउ विरघट आदींसह बौद्ध उपासक तथा उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण विरघट यांनी केले तर आभार धम्मपाल विरघट यांनी मानले.
0 टिप्पण्या