अकोला जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांनी बाभुळगाव सर्कलमधील पुरग्रस्त गावांची पाहणी केली.
अकोला/प्रतिनिधी - अकोला जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा परिषदेचे गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांनी आज दि. 24 जुलै 2021 रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी स्थानिक प्रशासनाची चर्चा करून जाहीर करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान बाभुळगाव, डोंगरगाव, सांगळूद बु. असा दौरा आखण्यात आला होता. यावेळी त्यांनी नागरिकांना दिलासा देत लवकरच शासकीय मदत जाहीर करण्याचे आश्वासित केले.
या दौ-यामध्ये नितेश किर्तक, सांगळुद ग्रामपंचायत सदस्य अमोल शिरसाट, योगेश किर्तक, दिलीप शिरसाट, सचिन शिरसाट, शीलवान शिरसाट, शुक्लोधन डोंगरे, सांगळुद ग्रामपंचायत सदस्य विशाल चिपडे, अनुप काकड, नितेश शिरसाट, शुभम वाहुरवाघ, विशाल वानखडे, अमोल सावळे, रोशन जैस्वाल आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या