वंचितनामा न्यूज नेटवर्क
नवनाथ पौळ
बीड - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पेठ बीड भागात पुर्णाकृती पुतळा आहे. जंयती व महापरिनिर्वाण दिनानिमित्त याठिकाणी भीमसैनिकांचा मोठा जनसागर उसळतो. अनेक राजकीय नेते मोर्चे, आंदोलने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करतात. मात्र शहराला व पेठ बीडला जोडणा-या या मुख्य रस्तयावर खड्डेच खड्डे पडले असुन पावसाचे पाणी या खड्डयात साचुन दुचाकी व चार चाकी वाहनधारकांना याचा त्रास होत असुन गेल्या अनेक दिवसापासुन या खड्डयामुळे नागरिक वैतागुन गेले आहेत. या गंभीर बाबीकडे नगर पालिकेचे अक्ष्मय दुर्लक्ष होत आहे. डॉ. आंबेडकर पुतळयासमोरील खड्डे तात्काळ दुरूस्त करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रचारक विवेक कुचेकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत पावसाच्या पाण्यामुळे खड्डयांचा अंदाज वाहनधारकांना येत नसल्याने अनेक वेळा या ठिकाणी छोटे मोठे अपघात देखील होत आहेत. गेल्या अनेक दिवसापासुन हीच परिस्थीती आहे या गंभीर बाबीकडे बीड नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नगरपालिका प्रशासनाने खड्डे तात्काळ बुजवावे अन्यथा बीड नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष प्रा, शिवराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका संघटक विवेक कुचेकर यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या