धुळे/प्रतिनिधी - साक्री तालुक्यातील धनगर बांधवांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये (दि. 30 जुलै रोजी) जाहीर प्रवेश घेतला. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा (प्रभारी) रेखा ठाकूर सद्या महाराष्ट्र दौ-यावर असून धुळे येथे झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये पक्षप्रवेश करण्यात आला.
धनगर समाजाचे युवा नेते नामदेव टकले, पंकज बाबा भदाणे, दीपक वाघ आदींसह कार्यकर्त्यानी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश घेतला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सविताताई मुंढे यांच्यासह धुळे जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या