नियोजनाचा अभाव, आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे सर्वसामान्यांची होतेय गैरसोय
वंचितनामा न्यूज नेटवर्क
नवनाथ पौळ
बीड - सध्या संपूर्ण देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक कोरोना लसीकरण सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून केज तालुक्यातील बनसारोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण अनेक दिवसांपासून सुरू आहे मात्र कोरोना लसीकरण सुरू असून देखील या केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना याचे भान नाहीये.
कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग व कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन आजपर्यंत कधीही होताना दिसून आले नाहीये. कुठल्याही प्रकारचे नियोजन आणि व्यवस्थितपणा केंद्रावर राहिलेला नाही. आणि त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्रात येणारे अनेक गाव हे लांबच्या अंतरावरील असल्याने त्या लोकांची गैरसोय होत आहे व अशा परिस्थितीतुन अनेक वृद्ध, महिला या ठिकाणी लसीकरणसाठी येतात, सकाळपासून लांबच्या लांब रांगा लावून बसलेल्या असतात मात्र बसलेले बसूनच राहतात आणि कर्मचाऱ्यांच्या वशिल्यावाले येतात आणि 2 मिनिटात लसीकरण करूनही जातात. केंद्रावर वशील्यानी लस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यातील काही कर्मचारी बाहेरील ओळखीच्या माणसांना फोन करून आत मध्ये बोलावून लसीकरण करून घेतात आणि लस घ्या मी नंतर ऑनलाईन करून घेतो अस सांगून जवळच्या लोकांना लस देतात. ओळखीचे लोक येतात लस घेऊन जातात आणि मग नंतर त्यांचं ऑनलाईन होत अशीही ओरड आहे.
अनेक वेळा ऑनलाईन चा बहाना सांगितला जातो पण जवळच्या लोकांचं ऑनलाईन नंतर करता येते म्हणजे जवळच्याना एक नियम आणि बाकिना एक का? बरेच लोक आरडा ओरड करतात पण त्याचं ऐकणारा कोणी नाहीये. आरोग्य अधिकारी तर कान बंद करून केबिनमध्ये बसलेले असतात. कोणी आरडा ओरड करण्याचा प्रयत्न केला तर तेथील कर्मचारी त्यांच्याबरोबर गैरवर्तन करून शांत बसवतात. या ठिकाणी टोकन मिळते पण लस घ्यायला मात्र दोन तीन दिवस चकरा माराव्या लागतात मग टोकन कशासाठी दिल जात? हा प्रश्न निर्माण होतो. जेवढ्या लसी येतात तेवढे कुपन जर दिले जात असेल तर मग टोकन वाल्याना लस का मिळत नाही? कर्मचाऱ्यांची वशिलेबाजी आणि असभ्य वर्तन कोण थांबवणार का? अधिकारी याकडे लक्ष देऊन कर्मचार्यांना समज देतील का? का अशीच लोकांची मानहानी आणि गैरसोय होत राहणार आहे. कर्मचाऱ्यांनी जिभेवर ताबा ठेऊन आपले वर्तन करायला अधिकारी भाग पडतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
0 टिप्पण्या